महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे येणार

आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता अखेर पैसे आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 6984 शेतकऱ्यांना 18 कोटी 1 लाख 66 हजार 309 एवढे रुपये मिळणार असून, दोन दिवसांमध्ये ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.

मागच्या दोन वर्ष बघता पावसाने शेतीचे फार नुकसान केलेले आहे. जुलै व ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी व महापुराने जिल्ह्यातील 74 हजार हेक्‍टरवरील पिकांचे फार मोठे नुकसान केले होते. ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत पिक कर्ज आहे, त्यांची कर्जमाफी, तर बिगर कर्जदारांना नुकसानभरपाई आम्ही देऊ.

असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तरी यामधील 96 हजार 663 शेतकऱ्यांना 294 कोटींची नुकसान भरपाई आतापर्यंत मिळालेली आहे. मात्र बँक खाते क्रमांक चुकीचे देणे, पंचनामा चुकीचा करणे व काही तांत्रिक अडचणीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 6984 शेतकरी ह्या कर्जमाफी पासून वंचित राहिले होते. आता या शेतकऱ्यांचे पुन्हा लेखापरीक्षण करून यादी शासनाकडे सुपूर्त केली आहे.

Read  Pik Vima Yojana Online Form List Maharashtra 2020-21पीक विमा तक्रार कोणाकडे करणार?

मात्र कोरोना काळात वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना निधीच उपलब्ध होऊ न शकल्यामुळे ते शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळाले नाही. उसने पासने पैसे करून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम घेतला. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये 75 कोटी 21 लाख रुपये निलेश मान्यता दिली आणि त्यानंतर जिल्ह्यासाठी 18 कोटी 1 लाख 66 हजार 309 रुपये मिळालेले आहेत.

आता ही प्रक्रिया पूर्णत्वास येऊन संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर येत्या दोन दिवसांमध्ये ही नुकसानभरपाईची रक्कम जमा होईल, असे अमर शिंदे जिल्हा उपनिबंधक सोलापूर यांनी म्हटले आहे

आमच्या खालील पोस्ट जरूर वाचा

कृषी यांत्रिकीकरण योजना 2020 अर्ज कसा करायचा?

ट्रॅक्टर व कृषी अवजारे अनुदान

Read  Maharashtra budget 2022-23 | नियमित कर्ज धारकांना 50,000 रुपये अनुदान

ट्रॅक्टर व कृषी अवजारांवर किती टक्के अनुदान मिळणार?

कृषी कर्जाला चक्रवाढ व्याजमाफी नाही, केंद्र सरकार

Leave a Comment