तुमच्या ताब्यात असलेली जमीन आणि 7/12 वरची जमीन सारखी आहे पहा मोबाईलवर

शेतकरी मित्रांनो सातबारा वरती जेवढी जमीन आहे, तेवढि प्रत्यक्ष आपल्या ताब्यात आहे किंवा नाही हे शेतकऱ्यांना माहिती नसते. जेवढी सातबारावर दिलेली जमीन आहे, तेवढी आपल्या हातामध्ये असणं किती गरजेचं आहे, त्यामुळे पुढे होणारे अनर्थ आपण टाळू शकतो आणि कोर्टाच्या फायदा सुद्धा आपल्याला चढावे लागणार नाही.

म्हणूनच ह्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईलवरच आपण आपली जमीन जी सातबारावर आहे तेवढीच आहे किंवा नाही हे आपण तपासू शकतो आणि तेही घरबसल्या. ती कशी तपासायची याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे हा लेख आपण संपूर्ण वाचा

मित्रांनो आपल्या डोक्यात हे पण येते की आपण शासकीय मोजणी करून घेऊ आणि त्याकरता तुम्हाला बरेच पैसे तिथे मोजावे लागतात. शासकीय मोजणी करायची असेल तर आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याची नोटीस द्यावी लागते म्हणजेच आपल्या शेताच्या सीमेलगत जी जमीन आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करावे लागते.

Read  Digital Satbara Utara Download Maharashtra डिजिटल सातबारा उतारा

मग काही लोक भानगड करण्यासही मागेपुढे पाहत नाही. त्यांना असे वाटते की माझी इथून जमीन आहे, तो म्हणतो माझी इथून आहे आणि त्यामुळे मग भांडण निर्माण होतात.

ह्या सर्व भानगडी पेक्षा आपण एक पर्याय तुमच्या समोर ठेवलेला आहे त्या पर्यायाने तुम्ही तुमची सातबारा वरील जमीन आणि प्रत्यक्ष तुम्ही वाहत असलेली जमीन ही सारखी आहे का? हे तुम्हाला मोबाईलवरच समजेल.

कधी कधी तर बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही चौकोनात किंवा आयात किंवा योग्य आकारमानात नसल्यामुळे त्याची मोजणी करणे म्हणजे डोकेदुखी होऊन बसते आणि त्यासाठी मोठा कालावधी सुद्धा खूप लागतो.

सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलच्या प्ले स्टोअर मध्ये जावे लागेल आणि तिथे एक application म्हणजे app डाउनलोड करायचा आहे. त्या app चे नाव आहे लॅंड एरिया कॅल्क्युलेटर (Land Area Calculator) असे टाइप करा आणि GPS Area Calculator. Download करा.

Read  7/12 मध्ये मोठा बदल शेतकऱ्यांना तलाठीं ची गरज नाही

डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये त्याला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर अशाप्रकारे तुम्हाला पहिलं पेज दिसेल ज्या ठिकाणी आपला लोकेशन आहे ते ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं शेत बघायचा आहे कुठे आहे तर, आपल्या शेतावर आपल्याला झूम करायचा आहे आपल्या शेताच्या चारही बाजू तुम्हाला तिथे दिसतील शेताचा आकार दिसेल खालच्या बाजूला उजव्या साईडला जे गोल आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे ते ओपन झाल्यानंतर डिस्टन्स आहे एरिया आहे बटन हे तुम्हाला दिसतील.

दोन नंबर वरचे बटन आहे येरीया (Area) यावर आपल्याला क्लिक करायचा आहे. नंतर तिथे दोन नंबरचे त्याबा हे बटन आहे मॅन्युअली( Manual) ह्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या शेताची मोजणी स्वतः तुम्ही करणार आहात. तिथे तुमच्या शेतामध्ये चारही कोपरे आहेत, त्यावर तुम्हाला मार्क करायचे आहे.

Read  Digital Satbara सातबारा उतारा मोबाईल नंबर टाकून कसा काढायचा?

शेताच्या सर्व बाजू आपल्याला दिसतील आणि आपलं क्षेत्रफळ किती आहे? हे तुम्ही सहज पाहू शकता, म्हणजे आपली जमीन आणि सातबारावरील जमीन ही सारखी आहे का? हे तुम्हाला ताबडतोब कळेल ही पोस्ट हा लेख तुम्हाला आवडला असेल तर कृपया सर्व शेतकरी बांधवांना जरूर पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x