आज आपण या लेखामध्ये एका महत्त्वपूर्ण शासन निर्णय बदल पाहणार आहोत या शासन निर्णयामुळे तुमचं स्वतःचं हक्काचं घर असणार आहे तुमचे घराचं स्वप्न होतं ते लवकरच पूर्ण होणार आहे आणि त्यामुळेच मित्रांनो आपण घरकुल योजनेची आस धरून असतो.
मग यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना असो, रमाई योजना असो, शबरी आवास योजना असो, पारधी आवास योजना असो किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल आवास योजना असो, या सर्व योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहेत.
मात्र घरकुल योजना म्हटलं की तक्रारी आल्या जसं की काम होत नाही वेळेवर पैसे भेटत नाही. घरकुल लवकर मंजूर होत नाही, म्हणूनच या सर्वांवर विचार करता सर्वांना हक्काचे घर लवकर मंजूर व्हावं ते त्यांना मिळावं ह्याकरता एक अभियान सुरू करण्यात आलेल आहे ते आहे ‘महाआवास अभियान’
महाआवास अभियानाचा जीआर आपण आता बघणार आहोत. या अभियानांतर्गत दहा उपक्रम राबविले जाणार आहेत ज्यामध्ये घरकुलाचे मंजुरी असेल, त्याचा निधी वाटप करणार आहे, चांगल्या दर्जाचा घरकुल बांधून देणार आहे.
आपल्याजवळ असलेल्या कमी जागेमध्ये जास्त बांधकाम करून देणे आहे, शौचालय तयार करून देणार आहे घरामधील पाणीपुरवठा असेल अशा सर्व प्रकारच्या पायाभूत किंवा आधारभूत सुविधा आहेत ह्या सुविधा देण्या बरोबरच ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधणी करता जमीन नाही, अशा लाभार्थ्यास जमीन उपलब्ध करून देणे आहे, हे सर्व उपक्रम त्यामध्ये राबवले जाणार आहेत. आणि हा उपक्रम राबवत असताना विभाग, तालुका किंवा जिल्हा जे चांगलं काम करतील त्यांना पुढे पारितोषिक सुद्धा मिळणार आहेत.
शंभर दिवसांचा हा कार्यक्रम राज्य सरकारने सुरू केलेला आहे आणि त्याचा जीआर काय आहे तेच आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया
मित्रांनो एकूण 19 नोव्हेंबर 2020 चा जीआर आहे. जीआर मध्ये सांगितल्याप्रमाणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यामध्ये महा आवास अभियान ग्रामीण राबविण्याबाबत अशाप्रकारे हा जीआर आहे.
प्रस्तावना मध्ये सांगितल्याप्रमाणे ‘सर्वांसाठी घरे 2022’ हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून, राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असून त्यांना पूरक पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी सहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना अशा योजनाही राबविण्यात येत आहेत
2020-21 या वर्षाकरता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 405077 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येये मधील ध्येय क्रमांक 11 नुसार किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्राचा विकास झाल्यास एकूण 17 पैकी किमान 14 वर सकारात्मक प्रभाव पडणार आहे यासाठी घरकुलांच्या कामाची प्रगती फक्त संख्यात्मक न राहता गुणात्मक रहावी
नाविन्यपूर्ण कल्पना अमलात आणून लाभार्थ्यांना सर्व सुविधायुक्त असे घरकुल उपलब्ध करून द्यावे तसेच नैसर्गिक आपत्ती इस सक्षमपणे सामोरे जाणारे घरकुल बांधकामासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे शासनाचे ध्येय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास योजना देशात दिनांक 20 नोव्हेंबर 2016 पासून अमलात आली असून दरवर्षी 20 नोव्हेंबर हा राष्ट्रीय आवाज दिन म्हणून राबवण्यात येतो
या वर्षी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास दिनाचे औचित्य साधून राज्य राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान ग्रामीण राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता
शासन निर्णय
सन 2020 21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी च्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत महा आवाज अभियान ग्रामीण राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता ने हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
अभियानाची उद्दिष्टे
राज्यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमान करणे.
ग्रामीण गृहनिर्माण योजना मध्ये शासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील सर्व घटक जसे पंचायतराज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्थांमध्ये कार्पोरेट, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ इत्यादींचा सक्रिय सहभाग वाढविणे.
ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे
ग्रामीण गृहनिर्माण योजना मधील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून आणणे
राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृती द्वारे लोकचळवळ उभी करणे
या योजनेचा राबवण्याचा कालावधी
भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे. ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत गरजू पात्र घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना
अ) पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना.
ब) शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना.
क) ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची योजना.
घरकुलांचे उद्दिष्ट प्रमाणे 100% मंजुरी देणे राज्य स्तरावरून केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत सन 2016 17 हा ते 2020 21 पर्यंत जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेल्या उद्दिष्टांना 100% मंजुरी देणे.
मंजूर घरकुलांना पहिल्या त्याचे शंभर टक्के वितरण करणे केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार वीस एकवीस मधील मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण विनाविलंब करणे.
घरकुलांच्या उद्दिष्टानुसार 100% घरकुले पावती दृष्ट्या पूर्ण करणे केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार वीस एकवीस मधील उद्दिष्टानुसार शंभर टक्के घरकुलांचे काम होते दृष्ट्या पूर्ण करणे.
प्रलंबित घरकुले पूर्ण करणे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल यांना पहिला हप्ता प्रधान केल्यापासून बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी येईल झालेल्या मात्र अद्यापपर्यंत अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले प्राधान्याने पूर्ण करणे व यापुढे अशा यादीमध्ये घरकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षता घेणे.
सर्व घरकुले आर्थिक दृष्ट्या पूर्ण करणे केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना मधील सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार वीस एकवीस मधील सर्व घरकुलांना भोवती प्रगतीनुसार सर्व हप्ते प्रधान करून सर्व घरकुले आर्थिक दृष्ट्या पूर्ण करणे.
ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची समन्वय ठेवून पूर्ण करून कुशल गवंडी तयार करणे.
डेमो हाऊसची उभारणी
घरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टं प्रमाणे पंचायत समिती निहाय सर्व डेमो हाऊसची उभारणी करणे.
कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सीडींग व आवाज प्लस मधील लाभार्थ्यांचे आधार सीडींग इन जॉब कार्ड मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मधील लाभार्थ्यांचे आधार सीडींग व आवाज प्लस मधील लाभार्थ्यांचे आधार सीडींग जॉब कार्ड मॅपिंग 100% पूर्ण करणे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मधून रोजगार व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मधून सौचालय देणे जल जीवन मिशन मधून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे प्रधानमंत्री उज्वला योजने मधून गॅस जोडणी देणे सौभाग्य योजने मधून विद्युत जोडणी देणे राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान व मधून उपजीविकेचे साधन देणे.
नाविन्यपूर्ण उपक्रम पुरेशी जागा नसल्यास. बहुमजली इमारत म्हणजे जी प्लस टू बांधणे. पुरेशी जागा असल्यास गृह संकुल उभारून त्याची सहकारी संस्था स्थापने.
लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी बँकेचे 70 हजार रुपये कर्ज स्वरूपात मिळवून देणे.
घरकुलांचे बांधकाम साहित्य जसे दगडविटा वाळू सिमेंट स्टील छताचे साहित्य इत्यादी उपलब्ध करण्यासाठी घरकुल मार्ट सुरू करून त्यात महिला बचत गटांचा सहभाग घेणे.
पंचायत राज संस्था आजकी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत असेल स्वयंसेवी संस्था सहकारी संस्था कार्पोरेट संस्था लाभार्थी व लोकसहभाग यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा देऊन आदर्श घरांची निर्मिती करणे.
GR पाहण्याकरिता येथे क्लिक करा
No
Yes