आता घ्या कांद्याचे 75 ते 80 दिवसात उत्पादन नाविन जात एन एच ओ 920 विकसित

आता घ्या कांद्याचे 75 ते 80 दिवसांमध्ये उत्पादन. कांद्याची नवीन जात विकसित झालेली आहे. कर्नाल येथील विभागीय संशोधन केंद्राने एन एच ओ- 920 ही कांद्याची नवीन जात विकसित केली आहे. फलोत्पादन क्षेत्रात नवीन संशोधन व विस्‍तार कार्य क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान यांच्याकडून संशोधन केले गेले आहे.

किती दिवसाचे उत्पादन आहे?

एन एच ओ 920 या कांद्याच्या नवीन जातीमुळे आपण लेट रब्बी हंगाम घेऊ शकतो.  या कांद्याच्या प्रायोगिक चाचण्या सुरू झालेल्या आहेत.  इतर कांद्याच्या तुलनेमध्ये हा कांदा लवकर म्हणजेच 75 ते 80 दिवसांमध्ये तयार होणार आहे, अशी माहिती या केंद्राचे उपसंचालक डॉक्टर पि.के. दुबे यांनी दिली, त्यांनी पुढे सांगितले की, या कांद्याची नवीन जाती विकसित करण्यासाठी आम्हाला चार वर्ष संशोधन करावे लागले.

Read  उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान | Kanda Lagwad lasalgaon

सतत संशोधन व चाचण्या केल्यानंतर या जातीचा काढणी कालावधी पंधरा ते वीस या दिवसांनी कमी झालेला आहे. सध्या उत्तर भारतामध्ये लागवडीकरता प्रक्षेत्र चाचण्या चालू आहेत. कारण तेथील हवामान ह्याकरता उपयुक्त आहे. सध्या बघता सरासरी हेक्‍टरी 350 ते 400 क्विंटल उत्पादन या जातीच्या कांद्याचे मिळालेले आहे.

संशोधन पूर्णत्वास येत आहे

एन एच ओ 920 संशोधन केंद्रामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लागवड करून विविध निरीक्षणे तिथे नोंदविण्यात आली. राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद पुसा, दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संशोधन कार्यालयाकडून या जातीस नॅशनल आयडी नंबर सुद्धा मिळालेला आहे, आणि त्यामुळे उत्तर भारतातील शेतकऱ्यांना लवकरच ही जात लागवडीकरता उपलब्ध सुद्धा होणार आहे.

जी अखिल भारतीय कांदा व लसुन संशोधन प्रकल्प आहे त्या मार्फत या जातीची लागवड करून विविध निरीक्षणे सुद्धा नोंदविण्यात येत आहेत. आणि म्हणूनच ही शेतकऱ्यां करता एक आनंदाची बातमी आहे.

Read  Ayurvedic Medicine Chia Seeds Production | आयुर्वेदिक चिया सीड्स उत्पन्न

हरियाणामध्ये प्रादेशिक लागवड सुरू

हरियाणा राज्यातील काही निवडक शेतकऱ्यांना प्रति 50 किलो बियाणे प्रायोगिक तत्त्वावर वितरित केले जात आहेत.  या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर लागवड ते काढणी दरम्यान विविध टप्प्यांवर निरीक्षण केले जातील, आणि या शेतकऱ्यांचा अभिप्राय सुद्धा घेण्यात येणार आहे.

तापमान कसे हवे?

तसे बघता इन एच ओ- 920 ही कांद्याची जात जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशासाठी किंवा भागासाठी अनुकूल नाही आहे. ही जात लेट रब्बीसाठी आहे. हरियाणामध्ये सध्या या जातीच्या चाचण्या चालू आहेत. भारतातील इतर राज्यांमध्ये ह्या चाचण्या पूर्ण झाल्या पाहिजे. काही शेतकऱ्यांना बीयाने देऊन हे लागवडीचे काम पूर्ण करण्यात येत आहे. परिक्षणे तपासल्यानंतर पुढील वर्षी आम्ही ही जात उपलब्ध करून देऊ असे बी. के. दुबे, कांदा पैदासकार व उपसंचालक विभागीय संशोधन केंद्र यांनी एच आर. डी. एफ. कर्नाल हरियाणा यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment