या योजनेचे अनुदान मिळणार, नवीन अर्ज सुरू होणार

नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील 2019 साठी ज्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासाठी किंवा तुषार सिंचनासाठी ऑनलाइन अर्ज केलेला होता पण त्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही, असे बरेच शेतकरी आपल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत मध्ये होते.

तरी आता आपण त्यांना ठिबक व तुषार सिंचन अनुदान कधी मिळणार व कसे मिळणार हे पाहणार आहे पण त्यांना नंतरही 2020 मध्ये ठिबक सिंचन घ्यायचे आहे.

अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा जीआर आहे तरी मित्रांनो आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहे सन 2020 यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत प्रती थेंब अधिक पीक घटकांच्या अंमलबजावणीसाठी रुपये 518 कोटी चा निधी कार्यक्रमास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

महाराष्ट्र शासनाचा दिनांक 21 ऑक्टोंबर 2020 रोजी चा शासन निर्णय आहे तरी आपण अधिक ची माहिती पाहू.

www.maharashtra.gov.in

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत  2020-21 या वर्षात अंमलबजावणी करण्यासाठी रुपये 518 कोटीच्या निधीचा सुधारित शासकीय मान्यता देण्यात आली आहे. 518 कोटी निधी पैकी केंद्र हिस्सा हा 310 कोटी एवढा आहे राज्य हिस्सा हा 208 एवढा आहे.  हा निधी केंद्रसकारचा व राज्य सरकारचा 60:40 असा आहे.

Read  Shelipalan Anudan in Marathi 2021 शेळी पालन

1. प्रशासकीय मंजुरी दिलेल्या निधीच्या कार्यक्रमांपैकी प्रत्यक्षात रुपये 366.72 कोटीचा निधी चा कार्यक्रम पुनर्जीवित निधीच्या कार्यक्रमासह राबविण्याची कार्यवाही करावी. यामध्ये यापूर्वी संदर्भनिधी दिनांक 11 जून 2020 च्या शासन निर्णयाने उपलब्ध करून दिलेल्या रुपये 100 कोटी निधीचा सुद्धा समावेश आहे.

आधी मंजूर केलेला निधी व आता मंजूर केलेला निधी सर्व एकत्रित दर्शविलेला आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी हा निधी 459 कोटी अनुसूचित जातीसाठी 25 कोटी अनुसूचित जमाती साठी 33 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

2. चालू वर्षी या योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीमधून सन 2019 20 या वर्षातील पूर्व संमती प्राप्त सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करून अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे प्रथमता निकाली लावण्यास यावी.

Read  Rashan Konala Milnar Nahi 2023 | राशन कोणाला मिळणार नाही 2023.

3. कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी एकच अर्ज करण्यासाठी कृषी विभागाने महा डीबीटी पोर्टल विकसित केलेले आहेत. सन 2019 20 या मध्ये ज्यांनी अर्ज केलेले असतील किंवा त्यांनी ठिबक संच खरेदी केलेले असतील अशांचे बाकी राहिलेले निधी पहिल्यांदा मिळणार आहेत.

तरी सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी एकच अर्ज करण्याची महाडीबीटी पोर्टल द्वारे विकसित केलेले आहे 2019 – 20 यातील अर्ज पूर्ण निकाली लागल्या वर 2020 – 21 या वर्षात नवीन अर्ज स्वीकारण्यात यावे उपलब्ध निधीच्या अर्जास पूर्वसंमती देऊन तसेच निकाली काढण्यात यावे. तसेच या निधीमधून मित्रांनो मागील वर्षीचे अनुदान सुद्धा मिळणार आहे.

या अनुदानातून जो निधी शिल्लक राहणार आहे त्या निधीतून नवीन अर्ज स्वीकारणे 2020 – 21 साठी महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन अर्ज करावयाचे आहे.

Read  Mahaawas Abhiyan Gramin 2021 महा वास अभियान ग्रामीण

याआधी ठिबक सिंचनासाठी स्वतंत्र पोर्टल होते ते आता बंद करण्यात आलेले आहे.  सर्व योजनांचा लाभ आता  महाडीबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत अशा योजनेत मागील ठिबक सिंचनाच्या अनुदाना बाबतीत तसेच नवीन योजनेसाठी अनुदानासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे.

आपण हे वाचले का?

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे येणार

CCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल?, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज

आता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही !

आता रब्बी हंगामाकरिता 4 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप होणार – दादासाहेब भुसे, कृषी मंत्री

Leave a Comment