रब्बी फळपीक विमा योजना 2020-2021, 2021-2022, नानासाहेब कृषी संजीवनी योजना POCRA

रब्बी फळपीक विमा योजना 2020-2021 व नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम.

आकस्मिक नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता शासनाने राज्यात मृग व आंबिया बहार सन 2020 – 2021 व 2022 – 2223 या फळपिकांना संरक्षण देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फळबागांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने रब्बी पीक विमा योजना लागू केली आहे.

शेतकरी मित्रांनो या लेखात आपण शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या रब्बी पिक विमा योजना सविस्तर पाहुण्यात.  शासनाकडून खरीप पिक विमा योजना राबविल्या जाते तसेच रब्बी पिक विमा योजना सुद्धा राबविल्या जाते तीच योजना सविस्तररीत्या आपण बघणार आहोत.  महाराष्ट्र शासन विविध योजना राबवीत असते त्याच धरतीवर शेतकऱ्यांना आपल्या निक्सानिचा विमा उतरविता यावा त्यांना नुकसान भरपाई मिळावी हाच हेतू राच्ची फळपिक विमा योजनेचा आहे.

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करणेबाबत असा जी आर 5 जून 2020 निघाला आहे त्यानुसार आता द्राक्ष, केळी, संत्र,पेरू, चिकू, मोसंबी या पिकांना लागू राहील. आणि ही योजना ३ वर्षांकरिता लागू राहील. ही योजना प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लागू राहील. मात्र मित्रांनो हा शासन निर्णय घेत असतांना यामध्ये काही महत्वपूर्ण बदन सुद्धा घेण्यात आले आहेत.

म्हणजे ही योजना ठराविक काही सर्कल मध्ये राबविण्यात येणार आहे. या मध्ये नुकसान भरपाईचा दर कुठला राहील हे खूप महत्वाचे आहे. कुठल्या कारणाने निक्सान भरपाई दिल्या जाईल हे सुद्धा महत्वाचे आहे. फळपिक विम्याचा हप्ता कशाप्रकारे असेल हे सुधा जी. आर. मध्ये नमूद केल्या गेले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे फळपिकांचे होणारे नुकसान पाहाता ही योजना अतिशय महत्त्वाची असून या फळपीक विमा योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, अशी शासनाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते.  त्यासाठी शासनाने सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वीही निर्गमित केलेल्या दिनांक पाच जून 2020 च्या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील.

यामध्ये शासनाने कर्जदार व बिगर कर्जदार या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट केले आहे . 2020 या चालू वर्ष अंतर्गत शेतकऱ्यांना आपला विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम दिनांक ही 24 जून असणार असून सन 2021- 2022 या वर्षासाठी संत्रा मोसंबी आणि लिंबू या फळपिकांची अंतिम दिनांक ही 14 जुन असेल.

Read  Gharkul Yojana List Online Maharashtra 2020-21 घरकुल योजना यादी

तसेच शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँकेकडून विमा प्रस्ताव सादर करणे आणि बँकांनी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे याबाबत अंतिम मुदत पुढीलप्रमाणे सांगता येईल

शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक हा मोसंबी या फळपिकासाठी 30 जून असेल तर द्राक्षे या पिकासाठी 15 ऑक्टोबर 2020 असेल. केळीसाठी 31 ऑक्टोंबर संत्रा काजू आणि कोकणातील आंबा यांच्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम दिनांक असेल.

संत्रा फळपिकांच्या साठी 20 जुन 2020 तर पेरु आणी लिंबु साठी 14 जुन 2021-22 असेल त्यासाठी
रब्बी फळ पिक विमा अंतर्गत आंबिया बहार पिक विमा अर्ज मागणी सुरू असून वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी विमा कंपनी शासनाने निर्धारित केली आहे.

अमरावती, वाशीम ,यवतमाळ ,अहमदनगर ,नाशिक, व सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यासाठी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स लिमिटेड ही कंपनी विमा प्रस्ताव घेणार असून कंपनीचा मुख्य पत्ता पुढीलप्रमाणे – एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड165 – 166 रिक्लेमेशन एच .टी .पारेख मार्ग चर्चगेट मुंबई 022-62346234, दूरध्वनी क्रमांक 022-66383600.

बीड ,औरंगाबाद ,अकोला, सांगली ,वर्धा ठाणे व हिंगोली इत्यादी जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड. या कंपनीचा कार्यालयीन पत्ता पुढील प्रमाणे – भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड स्टॉक एक्सचेंज टॉवर 20 मजला दलाल स्ट्रीट फोर्ट मुंबई 400023 , दूरध्वनी क्रमांक 022-61710912 .

सातारा ,परभणी ,जालना ,लातूर, कोल्हापुर या जिल्ह्यासाठी एचडीएफसी आरगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 165 – 166 रिक्लेमेशन एच .टी .पारेख मार्ग चर्चगेट मुंबई. दूरध्वनी क्रमांक – 022-66383600.
ले रायगड ,बुलढाणा, नांदेड ,पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी बजाज आलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड .

Read  Talathi Megabharti Maharashtra 2022 | तलाठी मेगाभरती महाराष्ट्र २०२२ .

कंपनीचा कार्यालयीन पत्ता पुढीलप्रमाणे – बजाज आलियांझ हाऊस ,एअरपोर्ट रोड येरवडा पुणे. दूरध्वनी क्रमांक 022-66026666. वरील वरील माहितीच्या आधारे शेतकरी आपल्या जिल्हानिहाय ठरवून दिलेल्या कंपनीशी संपर्क साधून किंवा प्रधानमंत्री फसल बीमा योजना ( PMFBY) या संकेत स्थळावर जाऊन शेतकरी आपला रब्बी फळ पिक विमा काढू शकतात.

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना
( पोकरा )अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना फळ पिकांमध्ये अधिक समृद्ध करणे व राज्याचे फलोत्पादन वाढवणे हा या मागील स्पष्ट उद्देश असून या योजनेअंतर्गत अर्ज मागवणे सुरू आहे.

यामध्ये सर्वप्रथम अर्जदार लाभार्थी यांच्या मालकीची किमान 0.20 हेक्‍टर जमीन असणे या योजनेअंतर्गत बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे सातबारा असणे व सातबारा उतारा लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक आहे.

शेतकर्‍यांच्या सातबारावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक व शेतकरी यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे असे असल्यास त्यांना प्रथम प्रधान या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे त्यानंतर आणि शेतकऱ्यांचा विचार शासन करत आहे.

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमात शेतकऱ्यांना लागणारी कागदपत्रे – 7/12 व 8अ ही मुख्य कागदपत्रे असून ती शेतकऱ्याच्या नावे असणे आवश्यक.

या योजनेअंतर्गत लागवडीस पात्र असलेली फळपिके पुढीलप्रमाणे – संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, आवळा ,पेरू ,डाळिंब, आंबा व कागदी लिंबू.

वरील फळ पिकांपैकी सीताफळ आणि लिंबू यांची कलमे उपलब्ध होत नसल्यास शेतकऱ्यांना रोपांची लागवड करता येईल व योजनेचा फायदा घेता येईल.

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज कोठे करायचा व कसा करायचा याबद्दल सविस्तर – सर्वप्रथम लाभार्थी शेतकऱ्यांनी http/dbt.mahapocra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती जाणून घेऊन नंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपला अर्ज सदर संकेतस्थळावर भरावा .

संकेतस्थळावर अर्ज भरणे पूर्ण झाल्यानंतर पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी यांची तांत्रिक मान्यता आवश्यक असतील ही तांत्रिक मान्यता दिल्यानंतर शासकीय नोंदणीकृत खाजगी रोपवाटिकांमधून कलमी किंवा रोपे शेतकरी खरेदी करून लागवड करू शकतात.

Read  Kusum Solar Pamp Yojana Maharashtra 2023 | कुसुम सोलार पंप योजना २०२३ .

शेतकऱ्यांनी लागवड करायची फळपिके व लागवड मध्ये अंतर आणि फळबागेसाठी या योजने अंतर्गत मिळणारे संपूर्ण अनुदान पुढील प्रमाणे –

संत्रा – लागवड अंतर 6 बाय 6 मीटर व मिळणारे आर्थिक अनुदान 99716 रु.

डाळिंब – मिळणारे आर्थिक अनुदान 109487 रु .

आवळा – लागवड अंतर 7 बाय 7 मीटर व मिळणारे आर्थिक अनुदान 49735 रु.

सिताफळ – लागवड अंतर 5 बाय 5 मीटर मिळणारे आर्थिक अनुदान – 72798 रु.

आंबा – लागवड अंतर 5 बाय 5 मीटर मिळणारे आर्थिक अनुदान 102530 रु.

पेरू – लागवड अंतर 3 बाय 2 मीटर गो मिळणारे आर्थिक अनुदान 202090 रु. पेरू कलम मध्ये – लागवड अंतर 6 बाय 6 मीटर व मिळणारे आर्थिक अनुदान 62472 रु.

मोसंबी – लागवड अंतर 6 बाय 6 मीटर व मिळणारे आर्थिक अनुदान 62578 रु.

कागदी लिंबू – लागवड अंतर 6 बाय 6 मीटर व मिळणारे आर्थिक अनुदान 62578 रु.

अशाप्रकारे शेतकरी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत फळबाग लागवड करून शेतकरी अनुदान मिळू शकतात . अधिक माहितीसाठी शेतकरी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने च्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकतात किंवा आपल्या कृषी सहाय्यक तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊन सदर योजनेची माहिती प्रत्यक्षपणे देऊ शकतात.

शेतकरी बांधवांनो आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्या व उपयोगी वाटल्या तर जरूर आपल्या जवळच्या शेतकरी बाधवांना जरूर पाठवा, आपण खाली दिलेल्या पोस्टची माहिती सुद्धा वाचू शकता.

जी आर पाहण्याकरिता येथे खाली क्लीक करा

GR 5 जून 2020 

आमचे अन्य लेख वाचण्याकरता खालील लिंक वर क्लीक करा

शेळीपालन करून मिळवा लाखो रुपये 

रब्बी फळपीक विमा योजना 2020-2021, 2021-2022, नानासाहेब कृषी संजीवनी योजना POCRA

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2020 ते 2021 व 2022 ते 2023

द्राक्ष बागेतील फळे छाटणी व त्यानंतर करायचे व्यवस्थापन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x