शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना मिळाले अनुदान आपणास मिळाले काय?

शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना मिळाले अनुदान बघूया

पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मुळे राज्य सरकारने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील 20 लाख 72 हजार 668 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर 1300 कोटी रुपये यापैकी 936 कोटी अनुदान जमा केलेले आहे मात्र राजधानी पैकी 30 टक्के शेतकरी हे अनुदानापासून वंचित आहेत.

आतापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये 100 टक्के अनुदान वाटप झालेले आहे तर बीड जिल्ह्यामध्ये 9.59% फक्त एवढेच अनुदान प्राप्त झालेले आहे.

आपण बघतो की मराठवाड्यामध्ये जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे फार मोठे नुकसान झाले आहे कपाशी सोयाबीन उडीद मूग या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवलेला आहे.

आता प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर 35 लाख 69 हजार चार शेतकऱ्यांच्या 24 लाख 95 हजार 901 हेक्‍टर नुकसान झाल्याचे समोर आले आहे मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते तद्वतच तद्वतच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी निर्देश दिले होते की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा करावी.  मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये ही नुकसानभरपाईची रक्कम अद्याप पर्यंत जमा झालेली नाही.

Read  Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२३.

या नुकसान भरपाई मध्ये सरसकट कोरडवाहू आणि बागायती शेती करता दहा हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. तर फळबागा करता पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. दिवाळीपूर्वी आपण बघतो की 70% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

औरंगाबाद मध्ये 40.45% जालन्यामध्ये 74.12% नांदेड मध्ये शंभर टक्के हिंगोली मध्ये 59.21% परभणी मध्ये 54.83% लातूरमध्ये 98% बीडमध्ये 9.49% तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 92.58% अनुदान आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहे दिवाळी च्या वेळेस बँकांना सुट्टी असल्या कारणामुळे हे अनुदान प्राप्त झालेले नाही

तरी उर्वरित अनुदान शासनाने जाहीर केलेले आहे ते त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असे सरकारचे म्हणणे आहे.

Leave a Comment