10 तारखेपासून कापूस खरेदीला सुरवात होणार

10 तारखेपासून राज्यामध्ये कापूस खरेदी केली जाणार आहे. सुरुवातीला 83 केंद्रांवरून ही कापूस खरेदी केली जाणार आहे. राज्यात 41 लाख एकर जमिनीवर कापसाची लागवड करण्यात आली होती 2019 20 मध्ये ही लागवड एका लाखांनी वाढली होती आणि या वर्षी तर दोन लाख हेक्‍टर कापसाचे लागवड क्षेत्र वाढले आहे. म्हणजेच 43 लाख हेक्टर कापसाची लागवड यावर्षी झाली आहे साडे चार लाख क्विंटल कापूस उत्पादकता होईल.

अशाप्रकारे तज्ञांचे म्हणणे आहे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे राज्यातील कापूस पीकावर कीड निर्माण झाली होती बोंडपाती गळाली आताच्या स्थितीमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गुलाबी बोंड अळीने पोखरलेले आहे याचा परिणाम कापूस पिकावर नक्कीच होणार आहे त्यामुळे अपेक्षित असलेली 450 लाख क्‍विंटल उत्पादकता 50 लाखाने कमी होईल असेच तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Read  Gharkul Yojana List Online Maharashtra 2020-21 घरकुल योजना यादी

त्यामुळे बाजारात येणाऱ्या कापसाची प्रत कमी राहणार आहे बाजारात येणारा कापूस हा हमीभावापेक्षा कमी असून सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजारात कापसाची आवक बऱ्यापैकी आहे संततधार यामुळे कापूस भिजला परिणामी त्यात ओलावा अधिक असल्याने शिष्याकडून खरेदीला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून दिवाळी साठी लागणाऱ्या पैशांची सोय म्हणून काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री केली.

कापसाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांची बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली. म्हणजे 3800 ते 4000 रूपाने कापसाची खरेदी करण्यात आली. सीसीआय हमी भाव जास्त असल्यामुळे कित्येक रुपयांची लूट करण्यात आली.  सरकारच्या लक्षात आल्यानंतरच सरकारने लवकर सीसीआय मंगळवार पासून लवकरच 83 केंद्र कापूस खरेदीचे घोषणा केल्याने बाजारात काही तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read  Online Driving License Application - लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करा घर बसल्या

कारण व्यापाऱ्यांचे लक्ष CCI कडे वळले आहे तसेच उत्तरेतील पंजाब, हरियाणा, राजस्थान सोबतच तेलंगणामध्ये सीसीआय कडून कापूस खरेदी सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात लवकरच म्हणजे मंगळवारपासून 83 केंद्रावर कापूस खरेदी केला जाईल असा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे तरी लवकरच राज्यांमध्येही 83 केंद्रावर सीसीआय कडून खरेदी चालू होणार आहे असे तज्ञांकडून वर्तविले जात आहे

Share on:

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment

x