तुमच्या आधारकार्ड वर कोणी सिमकार्ड तर वापरत नाही? Aadhar link to Sim Card

Aadhar link to Sim Card – तुमचा आधार क्रमांक वापरून कोणी सिमकार्ड तर घेतलं नाही ना ! काही मिनिटातच माहिती मिळवा. भारतात आधार कार्डचा उपयोग ओळख पटवून देण्यासाठी केला जातो तसेच कोणतेही काम असो किंवा शासनाविषयीचे काम बँकांविषयी चे काम आधार कार्डशिवाय होऊ शकत नाही.

तुमच्या आधारकार्ड वर कोणी सिमकार्ड तर वापरत नाही? Aadhar link to Sim Card

ओळख पटवून देण्यासाठी भारतीयांच्या कमी येते. यामुळेच बऱ्याचदा आधारचा दुरुपयोग सुद्धा केला जातो. दूरसंचार विभाग (DoT) ने यासाठी आपल्या वेबसाईटवर एक मोठा बदल केला आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा होणार दुरुपयोग समजू शकतो.

Read  Sakhrechya Utpannaat Ghat | साखरेच्या उत्पन्नात यावर्षी 20 ते 25 लाख टन घट शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसान.

DoT च्या या नवीन सुविधेचा वापर करून तुम्ही सहज तुमच्या आधार नंबरचा वापर करून घेतलेल्या मोबाईल नंबरची माहिती मिळवू शकता. इतकेच नव्हे तर तुमच्या ओळखीचे नसलेले किंवा तुम्ही वापरत नसलेले नंबर्स तुम्ही डिस्कनेक्ट देखील करू शकता. यासाठी तुम्हाला TAFCOP वेबसाईटची मदत घ्यावी लागेल

असे चेक करा

आधार नंबरवर रजिस्टर्ड असलेले मोबाईल नंबर सर्वप्रथम टेलीकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंज्यूमर Telecom Analytics for Fraud Management प्रोटेक्शन पोर्टल https://tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाईटवर जा.

इथे तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर एंटर करा.

त्यानंतर ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सबमिट करा.  आता तुमच्या आधार नंबरचा वापर करून विकत घेतलेले सर्व नंबर वेबसाईटवर दिसतील.  इथून तुम्ही अनोळखी किंवा अनावश्यक नंबर रिपोर्ट आणि ब्लॉक करू शकता.

Read  Mahaawas Abhiyan Gramin 2021 महा वास अभियान ग्रामीण

TAFCOP पोर्टलचा उपयोग

तुम्ही एका आधार कार्ड नंबरवर फक्त 9 मोबाईल कनेक्शन घेऊ शकता, असे निर्देश डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने दिलेले आहेत. ज्या युजर्सच्या नावावर 9 पेक्षा जास्त कनेक्शन आहेत, त्यांना एसएमएसच्या माध्यमातून सूचना पाठवण्यात येईल. असे युजर्स या पोर्टलवर जाऊन वरील प्रक्रिया पूर्ण करून अनावश्यक नंबर रिपोर्ट आणि ब्लॉक करू शकतात.

Leave a Comment