CLOSE AD

अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत मिळवा 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज

Published On: March 24, 2026
Annasaheb Patil Karj Yojana

Annasaheb Patil Karj Yojana : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये विशेषता बिनव्याजी कर्ज योजना ही एक महत्वाची योजना असून ती व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवते.

बिनव्याजी कर्ज योजनेचे वैशिष्ट्य

अनेक तरुणांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असूनही भांडवलाच्या अभावामुळे त्यांना संधी मिळत नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे अशा इच्छुकांसाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. या कर्जासाठी व्याजदर शून्य टक्के असून कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. विशेष म्हणजे, पहिला हप्ता अनुदान स्वरूपात देण्यात येतो.

योजनेची स्थापना आणि उद्दिष्ट

या योजनेची सुरुवात १९९८ साली करण्यात आली. महामंडळाचा मुख्य उद्देश म्हणजे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या व्यवसायविकासाला चालना देणे, आणि बेरोजगारीवर मात करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळते.

पात्रता आणि अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय पुरुषांसाठी ५० वर्षांपर्यंत आणि महिलांसाठी ५५ वर्षांपर्यंत असावे. अर्जदाराचे कुटुंब वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. याआधी कोणत्याही महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

गट कर्ज योजना

महामंडळामार्फत गट कर्ज योजना देखील राबवली जाते. यात सहकारी संस्था, भागीदारी संस्था, बचत गट, नोंदणीकृत संस्था आणि कंपन्यांना कर्ज मिळते. गट कर्जाची मर्यादा ५० लाख रुपये असून, त्यावर देखील व्याज शून्य टक्के असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा आहे.

कार खरेदीसाठी कर्ज

महामंडळाच्या माध्यमातून अर्जदार कार खरेदीसाठीही बिनव्याजी कर्ज घेऊ शकतो. यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याचे वय ५५ वर्षांपर्यंत असावे आणि त्याचे बँक खाते आधारशी लिंक असावे. अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही सरकारी कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

कर्जासाठी अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने https://udyog.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. नंतर कर्जासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे. अर्ज करताना वैयक्तिक माहिती, पत्ता, शिक्षण, उत्पन्न, आधार कार्ड, बँक खाते तपशील यासह आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची स्थिती संकेतस्थळावर तपासता येते.

महत्त्वाचे उद्दिष्ट

या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांना स्वप्नपूर्तीची संधी देणे आणि समाजात त्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे. ही योजना राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यास आणि मराठा समाजाला स्वयंपूर्ण बनवण्यास मदत करते.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment