Antarjatiya Vivah Yojana : नमस्कार मित्रांनो समाजातील जातीय भेदभाव दूर करून सामाजिक समरसता आणि एकात्मतेची भावना रुजविणे, हा आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. योजनेनुसार केंद्र शासनाकडून २५,००० रुपये आणि राज्य शासनाकडून २५,००० रुपये, असे एकूण ५०,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य लाभार्थी जोडप्यांना मिळते.
पात्रता
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी, विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक जण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. दुसरा व्यक्ती सवर्ण हिंदू, बौद्ध, जैन, लिंगायत किंवा शीख या समुदायांपैकी असावा. विवाह परस्पर संमतीने झालेला असावा आणि सदर जोडपे एकत्र आणि समाधानाने संसार करत असावे. जोडप्यांनी याआधी कधीही या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अर्ज प्रक्रिया
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक जोडप्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्हा समाजकल्याण अधिकारी, समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा. अर्ज स्वच्छ आणि स्पष्ट अक्षरात भरावा. अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे
अर्ज सादर करताना विहित नमुन्यातील अर्जासोबत वर आणि वधूचा एकत्रित फोटो जोडावा. अधिकृत विवाह नोंदणीचा दाखला, दोघांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि मागासवर्गीय व्यक्तीचा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून प्राप्त जात प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांनी दिलेला १५ वर्षांच्या वास्तव्याचा दाखला म्हणजेच डोमिसाईल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.Antarjatiya Vivah Yojana
स्टॅम्प पेपरवर साक्षांकित सत्य प्रतिज्ञापत्र सादर करावे, ज्यामध्ये योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नाही आणि सध्या सुखाने संसार चालू असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले असावे. वर आणि वधूच्या प्रत्येकी दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली शिफारस पत्रे मूळ स्वरूपात जोडावी. तसेच, रेशन कार्डाची छायांकित प्रत, वर व वधू यांची नावे असलेले एकत्रित बँक खात्याचे पासबुक (राष्ट्रीयकृत बँकेत असलेले) आणि आधार कार्ड यांच्याही प्रती सादर कराव्यात.
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra 2025
महत्त्वाची सूचना
सर्व कागदपत्रे प्रमाणित आणि सत्य असल्याची खात्री असावी. अपूर्ण, अस्पष्ट किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रांची योग्य मांडणी आणि पूर्णता अत्यावश्यक आहे.
नोट — ही योजना फक्त अकोला जिल्ह्यात सुरू आहे अधिक माहितीसाठी https://akolazp.gov.in/scheme/आंतरजातीय-विवाह-योजना-2/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

















