हरभरा लागवड तंत्रज्ञान | Harbhara Lagwad

Harbhara Lagwad हरभरा हे एक बहुउपयोगी पीक असल्यामुळे बाजारपेठेत हरभरा या पिकाला चांगली मागणी आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचे महत्व जाणता हरभरा लागवडीवर भर देणे आवश्यक आहे, अधिक उत्पादन आणि आर्थिक दृष्ट्या हरभरा हे पीक शेतकऱ्यांना परवडणारे आहे बाजारपेठेतील नवीन संकरित वाण व आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपल्या हरभरा पिकाच्या उत्पन्नात वाढ करू शकतात.

उत्तम दर्जाचे व अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जिरायत असो की बागायती पेरणी वेळेवर व चांगला भारी जमिनीत करण्याचे नियोजन करावे त्यासाठी रोग प्रतिकारक्षम तसेच अधिक उत्पादनशील वाणाची निवड करून त्यांची बियाणे उपलब्धता वेळेवर करुन घयावी . आधुनिक हरभरा लागवड तंत्रज्ञान वापरून शेतकरी आपल्या उत्पन्नात अधिकाधिक वाढ करून आपली आर्थिक प्रगती साधू शकतात.

हरभरा पिकाच्या पेरणीची योग्य वेळ –

शेतकरी जर बागायत क्षेत्रात हरभऱ्याची लागवड करणार असतील तर कमी खोलीवर पेरणी केली तरी चालते पण जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूप कमी झाल्यास उगवण उशिरा होऊ शकते पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले ,यांचे प्रमाण कमी होवू लागते.

शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सेंटीमीटर आणि दोन रोपांतील अंतर10 सेंटिमीटर राहील अशा पद्धतीनेच करावी म्हणजे जेणेकरून प्रति हेक्‍टरी उत्पादन संख्येत वाढ होईल.

तसेच जिरायत या पेरणी प्रकारात हरभऱ्याची जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजे सप्टेंबर अखेर अथवा दहा ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करावी. हरभरा या पिकास सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्‍टोबरच्या सुरवातीस पडणाऱ्या पावसाचा उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो जिरायती क्षेत्रावर बियाणे खोलवर दहा सेंटिमीटरवर अंदाजीत लावावे मात्र पाणी देण्याची सोय असेल तर हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर च्या दरम्यान केली तरी चालेल.

हरभरा या पिकासाठी करावयाची पूर्वमशागत –

हरभरा पेरण्यासाठी जमीन भुसभुशीत असावी म्हणजे नांगरणी योग्य प्रकारे केली गेली असली पाहिजे. शेतकऱ्यांनी खरीप पीक निघाल्या बरोबर जमिनीची खोल नांगरट करावी आणि त्यानंतर शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करावा सप्टेंबर ते शेवटपर्यंत हरभरा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी जमीन पूर्ण नियोजन करून तयार ठेवावी.

Read  Gajar Gavat असे करा शेतातील गाजर गवत नष्ट!

हरभरा लागवडीसाठी लागणारी जमीन व हवामान –

हरभरा लागवडीसाठी जमीन लक्षात घेता शेतकरी उथळ मध्यम जमिनीत देखील हरभरा लागवड करू शकतात परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पाण्याची व सिंचनाची व्यवस्था असणे आवश्यक आहे हलकी चोपण अथवा पाणथळ क्षारयुक्त जमिन हरभरा लागवडीसाठी वापरू नये.

हरभरा पिकास थंड व कोरडे हवामान सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो असे वातावरण पिकास चांगले मानवते विशेषत पिक विस ते पंचवीस दिवसाचे झाल्यानंतर तापमानात 10अंश सें. आणि कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल तर हरभरा पिकाची चांगली वाढ होऊन फुले फांद्या योग्य प्रमाणात लागतात.

हरभरा पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार भुसभुशीत जमीन असेल तर हरभरा पिकाच्या उत्पादनात वाढ निश्चितपणे होते.

हरभरा पिकासाठी घ्यावयाचे बियाण्याचे प्रमाण –

हरभरा पिकासाठी बियाणे निवडताना दाण्यांचा आकार एकसमान असला पाहिजे याची काळजी घ्यावी लागते. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विजय या मध्यम आकारमानाच्या वानांकरिता 65 ते 70 किलो अंदाजे तर विशाल आणि दिग्विजय व विराट अशा टपोऱ्या दाण्यांच्या धानाला 100 किलो प्रति हेक्‍टर प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. पि.के. व्ही .

4 या काबुलीवाणा करिता 125 ते 130 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. काबुलीवाणाला जमीन ओली करून व वाफशावर पद्धतीने पेरणी करता येते.

हरभरा पिकासाठी बीज प्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन –                                                                                 

बियाणाचे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणे मागे पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावा. यामुळे बुरशीजन्य रोगापासून बियाण्याचे संरक्षण करता येते. त्यानंतर दहा किलो हरभऱ्याचे बियाणे घेऊन रायझोबियम जिवाणू संवर्धनाची 250 ग्रॅम वजनाच्या एका पाकिटात जे संवर्धन आहे.

Read  जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? जमिनीची देखभाल कशी कराल?

त्या संवर्धनास गुळाच्या थंड द्रावणातून चोळुन घ्यावे गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. तसेच या प्रक्रियेनंतर बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी यामुळे हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेतले जाते व पिकात तीन ते पाच टक्के उत्पादनात वाढ होते.

हरभरा पिकासाठी पाण्याचे तांत्रिक व्यवस्थापन –

शेतकऱ्यांनी जिरायत हरभरा शेताचे बांधणी करताना दोन सऱ्यांतील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणात पाणी मिळून देने सोयीचे ठरते मध्यम प्रकारच्या

जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले त्यानंतर 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यायला हवे भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोन पाळ्या कराव्याच त्या करिता 30 ते 35 दिवसांत पहिले पाणी व 60 ते 65 दिवसांनी दुसरे पाणी द्यायला हरकत नाही.

हरभरा पिकाला सर्व साधारणपणे प्रमाण बध्द पाणी लागते प्रत्येक वेळी प्रमाणशीर असल्यास उत्तम ठरते. तसेच शेतकऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर ठेवायला हवे जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत हरभरा पीक पाणी दिल्यास तीन तीस टक्के दोन पाणी दिल्यास आठ टक्क्यांनी उत्पादनात वाढ होते.

तुषार सिंचनाद्वारे हरभरा पिकास पाणी –

हरभरा हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पिक उभडते आणि यामुळे उत्पादनात मोठी घट येते यासाठी या पिकास तुषार सिंचन हा अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि गरजेपुरते व्यवस्थित पाणी देता येते

तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीतअतिशय कमी असतो तण काढणे अतिशय सुलभ जाते नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुज सारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते परंतु तुषार सिंचनाने पाणी प्रमाणात देता येत असल्याने मुळकूज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.

Read   Aadhar to Pan Link  | आधार कार्डशी पॅन कार्ड कसे लिंक करावे जाणून घ्या.

हरभरा पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन –

हरभरा पिकावर कीड किंवा रोगांचा तेप्रादुर्भाव नेहमीच पाहायला मिळतो त्यापैकी घाटेअळी हरभऱ्यावरील मुख्य कीड आहे ही कीड हरभरा व्यतिरिक्त तूर ,मका ,सूर्यफूल ,टोमॅटो ,भेंडी , कापूस ज्वारी, वाटाणा इत्यादी पिकांवर नेहमीच पाहायला मिळते. घाटे अडी वर्षभरही शेतात वास्तव्यात असते यासाठी साधा उपाय म्हणून शेतामध्ये पंधरा ते वीस कामगंध सापळे लावावेत

त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग ओढले जाऊन पुढील प्रजननास आळा येतो अडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. हरभरा पिकावरील अळी खाण्यात काही मित्र पक्षीही आपली भूमिका बजावतात म्हणून त्यासाठी शेतामध्ये काठ्या लावून ठेवाव्यात पक्षी काठीवर बसतील आणि अळ्यांना टिपण्यास त्यांना सोपे जाईल.

कृत्रिम उपायांनी कीड नियंत्रण प्रभावीपणे करता येते कीटकनाशकाचा सारखा सारखा वापर न करताणा अदलुन बदलुन औषधे फवारावी हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच

पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी यासाठी पाच किलो निंबोळी अर्क व दहा लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी कापडाच्या साह्याने त्याचा रस काढावा आणि त्यामध्ये आणखी 90 लिटर पाणी टाकावे.व ते फवारणी करावी अशाप्रकारे किडीचे वस्थापन करून शेतकरी आपल्या येणाऱ्या अनाथ उत्पन्नात वाढ करू शकतात.

हरभरा या पिकात शेतकरी घेऊ शकणारी आंतरपिके –

हरभरा या पिकात शेतकर्‍यांनी सहा ओळी हरभऱ्याच्या व रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक घेता येते. तसेच उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर दहा सेंटिमीटर अंतरावर हरभऱ्याची एक पेरणी केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते

त्याच बरोबर हवेचा उपयोग करून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. हरभरा या पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुख्यता मोहरी ,करडई, ऊस अशी आंतरपिके घेऊन उत्पन्नात वाढ करू शकतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च व्यवस्थापन केल्यास हरभरा पीक शेतकऱ्यास उत्पन्नासाठी वरदान ठरू शकते. शेतकरी मित्रांनो Harbhara Lagwad हा लेख आवडला असेल तर नक्की इतर शेतकरी बांधवांना जरूर पाठवा

Leave a Comment