CLOSE AD

कुक्कुटपालन कर्ज योजना : या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना मिळणार १० लाख रुपयांपर्यंत कर्ज

Published On: September 20, 2025
Kukkutpalan Karj Yojana

Kukkutpalan Karj Yojana : मंडळी महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना 2025 ही एक उपयुक्त सरकारी योजना आहे, जी शेतकरी, बेरोजगार युवक, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आली आहे. जर कोणी स्वतःचा कोंबडीपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल किंवा सध्या चालू असलेला व्यवसाय वाढवू इच्छित असेल, तर ही योजना त्यांच्या उपयोगाची ठरू शकते.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बेरोजगारी कमी करणे आणि ग्रामीण भागात स्वरोजगाराच्या संधी निर्माण करणे. सरकार कोंबडीपालन व्यवसायासाठी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देते, ज्यामुळे कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येतो.

या योजनेअंतर्गत अर्जदारास ५० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी ५ ते १० वर्षांचा कालावधी दिला जातो. हे कर्ज राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि नाबार्डद्वारे मान्यता प्राप्त ग्रामीण वित्त संस्थांमधून मिळू शकते.

या योजनेचे काही प्रमुख फायदे

महिलांना, शेतकऱ्यांना आणि बेरोजगार तरुणांना कर्जाच्या माध्यमातून व्यवसायाची संधी मिळते. कर्जावर व्याजदर तुलनात्मकरीत्या कमी असतो. या माध्यमातून कोंबड्या, औषधं, पिंजरे, खाद्य यांसाठी आर्थिक सहाय्य मिळते. मोठी जागा आवश्यक नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकही सहजपणे व्यवसाय सुरू करू शकतात. यामुळे दुग्धव्यवसाय आणि शेतीबरोबर कुक्कुटपालन जोडून उत्पन्न वाढवता येते. विशेषता महिलांसाठी हा एक चांगला गृहउद्योगाचा पर्याय ठरतो.

या योजनेसाठी पात्रता

अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. त्याचे वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे. शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, कामगार अशा गटांना प्राधान्य दिले जाते. कोंबडीपालनाचा पूर्व अनुभव किंवा प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. स्वतःकडे थोडीफार जमीन किंवा जागा असावी आणि अर्जदार बँकेचा डिफॉल्टर नसावा.

अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे

आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, व्यवसाय आराखडा, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते झेरॉक्स, औषधं, पिंजरे यांचे बिल, प्राणी संगोपनाचे प्रमाणपत्र आणि संपर्कासाठी मोबाईल नंबर.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या राष्ट्रीयकृत किंवा ग्रामीण बँकेत जाऊ शकता. तेथे कोंबडीपालन कर्ज योजनेसाठी फॉर्म मिळतो. फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज बँकेत जमा करावा लागतो. अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी झाल्यावर बँक कर्ज मंजूर करते.

शेवटी जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तुमच्याकडे थोडीशी जागा असेल आणि मेहनतीची तयारी असेल, तर कोंबडीपालन व्यवसाय हे तुमच्यासाठी एक चांगले आर्थिक साधन ठरू शकते. या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःचे उत्पन्न वाढवू शकता आणि इतरांसाठीही रोजगार निर्माण करू शकता.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment