Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 

महात्मा ज्योतिबा फुले Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana यांनी आपल्या समाजासाठी शिक्षण,शिक्षणात सवलती ,इतर बाबींसाठी बरीच जण जागृती,त्यामधील तत्वे, समाजातील समता ह्या गोष्टी आपणा समोर आणून दिल्या. तसेच इतर काही जण योजना सुद्धा मंजूर केलेल्या आहेत. तर अशाच काही जण योजना आपण बघणार आहोत शिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana

Table of Contents

सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र.रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/ भाग १/ आरोग्य -६, दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि.१ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.या योजनेचा तपशील आपण खालीलप्रमाणे बघुयात. या योजनेचा लाभ कोण व कसा घेऊ शकतो ते आपण बघुया.

Shelipalan शेळीपालन

१) लाभार्थी

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिकाधारक कुटुंबे तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील  सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

२) विमा संरक्षण

या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष रुपये १.५० लाखापर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष २.५० लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीना वरील योजनेचा लाभ घेता येतो.

Gulvel गुळवेल फायदे

३) योजनेत समाविष्ट उपचार

३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. सदर योजनेत खालीलप्रमाणे विशेष सेवांतर्गत उपचार/ सेवा देण्यात येत आहेत. या योजनेच्या सनुषंगाने खालील सेवा देण्यात आलेल्या आहेत.

१)सर्वसाधारण शस्त्रक्रिया

२)काम, नाक घसा शस्त्रक्रिया

३)नेत्ररोग शस्त्रक्रिया

४)स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र

५)अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया

६)पोठ व जठार शस्त्रक्रिया

८)कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी

९)बालरोग शस्त्रक्रिया

१०)प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया

११)मज्जातंतूविकृती शास्त्र

१२)कर्करोग शस्त्रक्रिया

१३)वैद्यकीय कर्करोग उपचार

१४)रेडीओथेरपी कर्करोग

१५)त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया

१६)जळीत

१७)पॉलिट्रामा

१८)प्रोस्थेसिस

१९)जोखिमी देखभाल

२०)जनरल मेडिसिन

२१)संसर्गजन्य रोग

२२)बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन

२३)हृदयरोग

२४)नेफ्रोलोजी

२५)न्युरोलोजी

२६)पल्मोनोलोजी

२७)चर्मरोग चिकित्सा

२८)रोमेटोलोजी

२९)इंडोक्रायनोलोजी

३०)मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी

३१)इंटरवेन्शनल रेडीओलोजी

Maha Bhumi Abhilekh जमिनीची शासकीय मोजणी भूमी अभिलेख

४) विम्याचा हप्ता कसा भरावा

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya  योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विमाच्या हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्सुरंस कंपनीस अदा करण्यात येतो.

५) योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये

या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रूग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात घेऊ शकतो.

६) नि:शुल्क

सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांचेकडील शुभ्र शिधापत्रिका व ७/१२  उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत.

वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांतील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर १० दिवसापर्यंतच्या सेवा पँकेज मध्ये समाविष्ट आहेत.

७) आरोग्य मित्र

अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णाची नोंदणी, उपचारा दरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहेत.

Read  Kanya Sumangal Yojana Maharashtra Online Form 2023 | कन्या सुमंगल योजना महाराष्ट्र ऑनलाइन फॉर्म 2023.

८) आरोग्य शिबीर

योजेनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरांत रुग्णांची तपासणी करून योजनेतील ९७१ उपचारापैकी उपचारांस सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार केले जातात.

९) राज्य आरोग्य हमी सोसायटी व नियामक परिषद

योजनेच्या दैनंदिन कामकाजाचे सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात तसेच यावर नियंत्रक म्हणून मा. मुख्य मंत्री. राज्य यांच्या अध्यक्षतेखाली नियामक परिषद कार्यरत आहे.

१० )विमा कंपनी आणि व तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्या

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya योजनेची राज्यात अमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्सुरंस कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्याची निवड केलेली असून त्यांचा मार्फत अंगीकृत रुग्णालयांची निवड, उपचारांच्या पूर्व परवानगीची तपासणी करणे, दाव्यांची तपासणी करणे, आरोग्य मित्राची तसेच राज्य व जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ह्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडण्यात येतात.

एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना

राज्यात योजनेचा पहिला टप्पा दिनांक २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती नांदेड, सोलापूर,धुळे,रायगड, उपनगरीय मुंबई, मुंबई शहर या आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने दिनांक २१.११.२०१३ पासून ही योजना राज्यव्यापी केलेली आहे.
दिनांक ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ही योजना सुरु झाली व दिनांक १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

दिनांक २३.०९.२०१८ पासून आयुषमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबरोबर एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. दिनांक ०१.०४.२०२० पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजना राज्यामध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे.

१) उद्देश

राज्यातील जनतेलागंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे

२) लाभार्थी

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
श्रेणी अ:अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबे.

श्रेणी ब

औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

श्रेणी क:शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

प्रधान मंत्री जन आरोग्य योजना

1) २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातनिहाय जनगणनेतील (SECC २०११ ) ग्रामीण व शहरी भागांसाठी ठरवलेल्या निकषानुसार ८३.७२ लक्ष कुटुंबे योजनेचे लाभार्थी आहेत.

२)आरोग्यमित्र -सर्व अंगीकृत रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात.

३) रुग्ण नोंदणी- रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते.
ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागद पत्रांची यादी
जीवनदायी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

४)उपचार पूर्व मान्यता-

या प्रकीयेमध्ये उपचारांसाठी मान्यता देण्यासाठी संगणकप्रणालीवर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पॅकेजनिहाय आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मान्यता नाकारण्यात आलेले प्रिऔथ तांत्रिक समितीकडे पाठविले जातात.
तांत्रिक समितीमध्ये विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य वैद्यकीय सल्लागार निर्णय देतात.
त्यांच्या निर्णयामध्ये तफावत असल्यास अश्या केसेस अंतिम मान्यतेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सहाय्यक संचालक यांच्याकडे पाठविण्यात येतात.

ही प्रक्रिया १२ तासात पूर्ण होणे अपेक्षित आहे. इमर्जन्सी केसेस मध्ये रूग्णालयांद्वारे Emergency Telephonic Intimation (ETI) घेतले जाते. अशा केसेसमध्ये रुग्णांना वैध शिधापत्रिका १२० तासाच्या(कामाचे ५ दिवस) आत सादर करणे आवश्यक असते.

५) योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये

या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय, खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना आधीन राहून करण्यात आली आहे.
लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतो.

सध्या योजनेमध्ये खाजगी आणि शासकीय ९७३ रुग्णालये अंगीकृत आहेत.

६) NABH Grading –विमा कंपनी/टीपीए व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे प्रतिनिधी रुग्णालयांचे NABH परीक्षण करतात.
परिक्षणाद्वारे श्रेणी निश्चितीबाबत प्रणाली सार्वजनिक आरोग्य विभाग व राज्य आरोग्य हमी सोसायटी यांनी Quality Council of India, NABH च्या मान्यतेने संयुक्तपणे तयार केली आहे.
यामध्ये ९ मुख्य घटकांच्या अंतर्गत ८५ मानांकने आहेतपरीक्षणानंतर प्राप्त झालेल्या श्रेणीनुसार त्यांच्या दाव्यांचे प्रदान केले जाते.
मल्टीस्पेशलिटी रुग्णालयांना
अ (१००%),
ब (९०%) व
क (८०%) अशा ३ श्रेणी लागू आहेत व सिंगल स्पेशलिटी रुग्णालयांना
अ (१००%) व
ब (९०%) अशा दोन श्रेणी लागू आहेत.
NABH परिक्षणानंतर देण्यात आलेली श्रेणी ६ महिने वैध असते व त्यानंतर रुग्णालयास पुनर्परिक्षणाच्या माध्यमातून श्रेणीमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जाते.

Read  Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2022 | अतिवृष्टी अनुदान भरपाही यादी २०२२ .

७)योजनेत समाविष्ट उपचार 

योजनेंतर्गत ३४ विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठ्पुरावा सेवांचा समावेश आहे.
तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ उपचार व १८३ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.

८)सेवा 

एकत्रित योजनेंतर्गत लाभार्थ्यांना

१) शस्त्रक्रिया,

२)नेत्र,

३)शस्त्रक्रिया,

४) स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया,

५)अस्थिव्यंग शस्त्रक्रिया,

६) हृदय शस्त्रक्रिया व उपचार,

७) जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व
उपचार,

८)बालरोग शस्त्रक्रिया व उपचार,

९) मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी,

१०) जळीत रुग्णावरील उपचार,

११)कृत्रिम अवयव,

१२) आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या,

१३)सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार,

१४)ऐनडोक्राईन,

१५)लहान मुलांचे कर्करोग,

१६)मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडीऑलोजी उपचार यांचा लाभ मिळतो.

९)दावे (Claims) :

रुग्णाची रुग्णालयातून सुट्टी केल्यानंतर १० दिवसांनी आवश्यक कागदपत्रासह दावे अंगीकृत रुग्णालयाद्वारे संगणक प्रणालीवर अपलोड केले जातात. अपलोड करण्यात आलेले दावे तपासणीसाठी टीपीए कडे येतात. सर्व आवश्यक कागदपत्रांसह संगणक प्रणालीवर सादर करण्यात आलेल्या दाव्यांना मंजुरी देण्यात येते.

जर काही कागदपत्रे सादर केली नसल्यास दावे प्रलंबित ठेऊन रुग्णालयांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते.
मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांचे प्रदान विमा कंपनीद्वारे अंगीकृत रुग्णालयांना १५ कामाच्या दिवसांमध्ये करण्यात येते.
कोणत्याही कारणांनी दावा ना मंजूर झाल्यास पहिले अपील विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या स्तरावर तर दुसरे व अंतिम अपील मध्यवर्ती दावे समितीकडे करता येते.

१०) आरोग्य शिबीर

योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्णालयामार्फत आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येतात.
या शिबिरात रुग्णांची तपासणी करून एकत्रित योजनेतील ९९६/१२०९ उपचारापैकी उपचारास सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जातात.

प्रत्येक अंगीकृत रुग्णालयाने प्रत्येक महिन्यात किमान १ आरोग्य शिबिर आयोजित करणे अपेक्षित आहे.

१०) पाठपुरावा सेवा

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी १२१ उपचारासाठी पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत.
तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेसाठी १८३ पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत.

११)क्लिनिकल प्रोटोकॉल:

रुग्णावर उपचार करताना तज्ञांना योग्य प्रोसिजर्स निवडण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने क्लिनिकल प्रोटोकॉल्स तयार करण्यात आले आहेत.

सुधारीत एकत्रित योजनेतील नवीन प्रोसिजर्स साठी क्लिनिकल प्रोटोकॉल तयार करण्यात येत आहेत. हे प्रोटोकॉल Preauthorization मॉड्यूल सोबत सलग्न करण्यात आले आहेत.

उपचाराची कारणे, तपासण्या, लक्षणे, उपचार कोणत्या परिस्थितीत करता येणार या बाबींचा समावेश यात केला आहे.
तज्ञाकडून हे तयार करण्यात आले असून त्याचे पायलट टेस्टिंग करण्यात आले असून रुग्णालयांना Preauthorizationपाठविताना क्लिनिकल प्रोटोकॉल फॉर्म भरणे बंधनकारक आहे.

१२)राज्य आरोग्य हमी सोसायटी व नियामक समिती –

योजनेचे सनियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून केले जाते. नियामक समितीचे अध्यक्ष मा.प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग हे आहेत.

१३)योजनेचा प्रचार

योजनेचा प्रचार व प्रसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करणे ही राज्य आरोग्य हमी सोसायटीची जबाबदारी आहे.

१४) तक्रार निवारण

१५५३८८ / १८००२३३२२०० या टोल फ्री नंबर वर लाभार्थी योजनेची माहिती घेऊ शकतात तसेच सेवेबाबत तक्रार करू शकतात.

१५) प्रती कुटुंब प्रती वर्ष आर्थिक मर्यादा –

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५० लक्ष पर्यंत विमा संरक्षण मिळते.
मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा २.५० लक्ष आहे.
प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लक्ष पर्यंत विमा संरक्षण मिळते.
लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किवा अनेक व्यक्तीना या योजनेचा लाभ घेता येईल.

१६) नि:शुल्क सेवा – (Cashless Medical Service)

सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रुग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे.
सदर योजना पूर्णतः संगणकीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी, अवर्षण ग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी) तसेच फोटो ओळख पत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतात.

वैद्यकीय सेवांमध्ये
१)रुग्णालयीन उपचार,
२)निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, ३)आवश्यक औषधोपचार,
४) शुश्रुषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यावर पाठपुरावा सेवा आणि १० दिवसापर्यंत गुंतागुंत झाल्यास त्याचे मोफत उपचार समाविष्ट आहेत.

१७)विमा कंपनी व तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्या

योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनीया सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.विमा कंपनी सध्या तीन तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्यांमार्फत अंगीकृत रुग्णालयाची निवड, उपचाराच्या पूर्व परवानगीची तपासणी करणे,दाव्यांची तपासणी करणे, आरोग्य मित्रांची तसेच राज्य व जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ईत्यादी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत आहे.

Read  Zilla Parishad Bharti 2022 | जिल्हा परिषद भरती २०२२ .

१८)शैक्षणिक मार्गदर्शन

उपचारांची पूर्व परवानगी व दावे अंतिम करण्यासाठी ज्या बाबींची आवश्यकता आहे व त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शक सूचना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम करण्यात आल्या असून त्या संगणक प्रणालीवर उपलब्ध आहेत. तसेच त्या सर्व अंगीकृत रुग्णालयांना पाठवण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या मदतीने पूर्व परवानगी व दावे अंतिम केले जातात.

१९)२३ मे २०२० रोजीचा शासन निर्णय कोविड १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सद्य स्थितीत राज्यातील सर्व नागरिकांना या शासन निर्णयाद्वारे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत आहेअशा लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी कोणतेही वैध रेशन कार्ड तसेच फोटो ओळखपत्र किवा तहसिलदार प्रमाणपत्र किवा अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

कोविड १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक शासकीय रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित केल्यामुळे शासकीय रुग्णालयांसाठी आरक्षित १३४ उपचारांपैकी १२० उपचार खाजगी अंगीकृत रुग्णालयांना खुले करण्यात आले आहेत.

बरीचशी शासकीय रुग्णालये कोव्हिड उपचारासाठी आरक्षित केल्याने नॉन कोव्हिड ६७ रोग निदान चाचण्या, minor &major procedures चा लाभ नागरिकांना खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून देण्यात येत आहे.सदर लाभ ३१ जानेवारी २०२१ पर्यंत अनुज्ञेय असून सदर कालावधी वाढविण्याबाबत पुढील निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन शासनामार्फत घेण्यात येईल.

कोव्हिड रुग्णासाठी २० श्वसन संस्थेचे व ICU उपचार उपलब्ध असून रुग्णास सहज उपचार मिळावेत म्हणून १० उपचारांना काही बाबीत शिथिलता देण्यात आली आहे.

२०)आपणास मदत लागल्यास मदतीसाठी संपर्क खालीलप्रमाणे दिलेला आहे

• टोल फ्री क्रमांक – १५५३८८ / १८००२३३२२००

• रुग्णालय – आरोग्य मित्र

• पत्ता – पो. बॉक्स क्रमांक १६५६५, वरळी पोस्ट ऑफीस, वरळी, मुंबई ४०००१८

• संकेतस्थळ – www.jeevandayee.gov.in

आपण यांच्याविषयी आणखी काही निर्णय बघुयात :–

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना  संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक ४ ऑगस्ट २०१६ रोजी जारी केला.

शासन निर्णय क्रमांक आहे :-
रागांयो -२०१६/प्र.क्र.६४/आरोग्य-६,सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन.

प्रथम माहिती

राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या जुन्या योजनेच्या धर्तीवर नविन उपचारांचा समावेश असलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेमध्ये समाविष्ट लाभार्थी

१)दारिद्र्य रेषेखालील पिवळे,

२)अंत्योदय अन्न योजना ,

३)अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक व दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक (रु.१ लाखापयंत वार्षिक उत्पन्न असलेली ) कुटुंबे (शासकीय,निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून)

३)औरंगाबाद , अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा असे एकूण १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रक शेतकरी श्रम शाळेतील विद्यार्थी,
महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक तसेच अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब व अन्य लाभार्
संबधित प्रशासकीय विभागाकडून या लाभार्थी घटकांची अचूक आकडेवारी उपलब्ध करून घेऊन लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात येइल व या लाभार्थी घटकांना योजनेअंतर्गत विमा तर्मा संरक्षण उपलब्ध करुन दिले जाईल.

लाभार्थी ओळख

लाभार्थ्यांची ओळख राज्य शासनाने निश्चित केल्यानुसार योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास देण्यात येणारे आरोग्य ओळखपत्र किंवा असंघटीत कामगार ओळखपत्र / स्मार्ट कार्ड किंवा राज्य शासन निर्धारित करील अशा इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारे पटवली जाईल.

खर्चाची मर्यादा

योजनेंतर्गत समाविष्ट उपचार पद्धतीवरील  उपचारांसाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा सरंक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रती कुटुंब रु. २.००  लाख एवढी असेल

मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रती वर्ष / प्रती कुटुंब रु. ३.०० लाख असेल.  यामध्ये दात्याचा समावेश असेल.

या योजनेंतर्गत उपचार सुरु होण्यापूर्वी असलेल्या आजारांचा समावेश राहील

मेडिकल प्रोसिजर्स

योजनेमध्ये पूर्वीच्या ९७१ प्रोसिजर्सपैकी अत्यंत कमी वापर असलेल्या प्रोसिजर्स वगळण्यात वगळण्यात आल्या असून काही नवीन प्रोसिजर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कर्करोग, बालकांवरील उपचार, वृद्धांवरील उपचार Hip & Knee Replacement,  तसेच सिकलसेल, अॅनिमिया, डेंग्यू,  स्वाइन फ्ल्यू इ. साठी नवीन उपचारांचा समावेश करून रक्तविकार शास्त्र (Hematology) या  विशेषज्ञ सेवेसह ३१  विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण ११०० प्रोसिजर्सचा (परिशिष्ट अ ) समावेश या योजनेमध्ये करण्यात  येत आहे असून त्यामध्ये १२७ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे (परिशिष्ट अ-१)  तसेच १११ प्रोसिजर्स (परिशिष्ट अ-२) शासकीय रुग्णालयांसाठी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्याकरिता राखीव करण्यात येणार आहे.

योजनेतील अंगीकृत रुग्णालये

योजनेमध्ये रुग्णालय अंगीकरणासाठी पूर्वी निश्तित केलेली कार्यपद्धती व मानके कायम राहतील तसेच योजनेमध्ये सहभागी होणार्या रुग्णालयांची संख्या मर्यादित राहणार नाही. डोंगराळ / आदिवासी / वर नमूद केलेल्या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील सर्व रुग्णालयांना योजनेंतर्गत अंगीकृत होण्यासाठी निकष शिथिल करून कमीत कमी २० खाटांची मर्यादा राहील. राज्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी अंगीकृत रुग्णालये संख्येची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रॉमाकेअर,ऑन्कॉलॉजी इत्यादी विशेषज्ञ सेवांसाठी प्राधान्याने रुग्णालये अंगीकृत करण्यात येतील. आवश्यकता भासल्यास अपवादात्मक परिस्थितीत सीमावर्ती राज्यातील शासकीय रुग्णालयांना एका वर्षासाठी अंगीकृत करण्यात येईल

परिशिष्टे

सदरील शासन निर्णयामध्ये उपचारांची, पाठपुरवा सेवांची, उपचार पद्धतींची तसेच आरोग्य योजना समित्यांची रचना व कार्य यासाठी पुढील परिशिष्टांचा समावेश केला आहे.

परिशिष्ट अ (पान नंबर – ६ ते ४२) –  आरोग्य योजनेंतर्गत ११०० विविध उपचारांची यादी

परिशिष्ट अ-१ (पान नंबर – ४३ ते ४५)  –  १२७ पाठपुरावा सेवांची यादी

परिशिष्ट अ-२ (पान नंबर – ४६ ते ४८)  – शासकीय रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये यांच्यासाठी राखीव असलेल्या १११ उपचार पद्धतींची यादी

परिशिष्ट ब (पान नंबर – ४९-५०)  – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समित्यांची रचना व कार्य

अश्याप्रकारे आपण या योजना बघितल्या आहेत.

Leave a Comment