CLOSE AD

पीएम आवास योजनेची नवीन यादी जाहीर , लगेच पहा तुमचे नाव

Published On: September 24, 2025
PM Aawas Yojana List

PM Aawas Yojana List : मंडळी तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि अजूनही तुमचं स्वतःचं पक्कं घर नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. भारत सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि बेघर कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

नवीन लाभार्थी यादी जाहीर

सरकारने 2025 साठी प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्या व्यक्तींना घरासाठी अनुदान मिळणार आहे त्यांची नावे समाविष्ट आहेत. तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचं नाव यादीत आहे का हे आता सहज ऑनलाइन तपासता येणार आहे.

ऑनलाइन नाव तपासण्याची प्रक्रिया

1) सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ची अधिकृत वेबसाईट pmayg.nic.in उघडा.
2) मुख्य पानावर AwaasSoft या पर्यायावर क्लिक करा.
3) त्यानंतर Reports हा पर्याय निवडा.
4) Verification Reports मध्ये H. Social Audit Reports या पर्यायावर क्लिक करा.
5) पुढे तुमचं राज्य, जिल्हा, तालुका (ब्लॉक), ग्रामपंचायत आणि वर्ष (2024-25) ही माहिती भरा.
6) दिलेला सुरक्षा कोड (Captcha) भरून Submit बटणावर क्लिक करा.
7) आता स्क्रीनवर लाभार्थ्यांची यादी उघडेल. त्यामध्ये तुमचं नाव शोधा. हवी असल्यास ही यादी PDF स्वरूपात डाउनलोड करता येते.

योजना तपासणं का महत्त्वाचं आहे?

जर तुमचं नाव यादीत असेल, तर तुम्हाला घर बांधण्यासाठी सरकारी मदत मिळू शकते. त्यामुळे वेळ न घालवता ही माहिती तपासा. योजना पूर्णपणे पारदर्शक असून कोणतीही दलाली न देता सरकारी संकेतस्थळावरूनच तपासणी केली जाते.

ही योजना गरजू लोकांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या ओळखीतील इतर गरजू व्यक्तींशी, नातेवाइकांशी आणि गावातील लोकांशी जरूर शेअर करा. महाराष्ट्रातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment