Rooftop Solar Plant मित्रांनो व्यवसाय म्हटला की पैशाची गुंतवणूक आलीच त्याचबरोबर जागेचा सुद्धा प्रश्न असतो मात्र या लेखांमध्ये मी तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहे ज्याच्यासाठी 70 हजाराची गरज लागेल आणि जागा सुद्धा तुमचीच राहील. तुमच्या घराच्या छतावर आज तुम्ही हा व्यवसायिक करू शकता आणि लाखो रुपये घरबसल्या कमवू शकता.
याकरता मित्रांनो तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवावे लागतील. या पॅनल करता एक लाख रुपये पर्यंत खर्च येईल परंतु केंद्र सरकारच्या न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयातर्फे रूप टॉप सोलर प्लांट करिता 30 टक्के सबसिडी मिळत असते.
या सोलर प्लांट मधून तयार होणारी वीज तुम्ही सरकारला विकू शकता 70 हजार रुपयांमध्ये हा प्लांट तुम्हाला एक किलोवॅट क्षमतेचा उभारता येईल यासाठी किंमत सुमारे 1 लाख रुपये लागेल सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडी नंतर ही रक्कम फक्त तुम्हाला 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत खर्च करावी लागेल.
अनेक राज्यांमध्ये तीस टक्के पेक्षाही जास्त सबसिडी दिला जाते जर तुमच्याकडे 70 हजार रुपये नसतील तर कोणत्याही बँकेतून तुम्ही लोन घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. 25 वर्षापर्यंत तुम्हाला याची कमाई होत राहील. सोलर पॅनलचे आयुष्य साधारणतः 25 वर्षाचे असते आपल्या घराच्या छतावर हा प्लांट तयार केल्यानंतर यातून निर्माण होणारी जी वीज आहे ती आपण स्वतःही वापरू शकतो आणि उरलेली विज तुम्ही ग्रिट च्या माध्यमातून कोणत्याही कंपनीला किंवा थेट सरकारला सुद्धा विकू शकता म्हणजेच तुमच्या घरचे बिल सुद्धा वाचेल शिवाय तुमची कमाई सुद्धा होईल.
तुमच्या घराच्या छतावर जर 10 तास सूर्यप्रकाश पडत असेल, तर दोन किलो वॅट सोलर पॅनल चा वापर करून तुम्ही दिवसाला दहा युनिट वीज तयार करू शकता म्हणजेच महिन्याला जवळपास 300 युनिट वीज तयार होते तुम्ही जास्तीत जास्त पाचशेव्या क्षमतेचा एक पॅनल बसू शकता एक किलोवॅट क्षमतेचा प्लांट बसवण्यासाठी असे दोन पॅनल आवश्यक आहेत हा एक पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला 50 हजार रुपये खर्च येईल. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही 1 किलो वॅट ते 5 किलो वॉट पर्यंतचे प्लांट बसू शकता आणि विशेष म्हणजे हे सोलर पॅनल एकदा बसवले की पुन्हा दहा वर्षापर्यंत त्याच्याकडे पाहण्याची गरज नसते 10 वर्षांनी त्याची बॅटरी बदलावी लागते. याकरता 20 हजार रुपये खर्च येतो मधल्या काळात तुम्ही घर बदललं तरी चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला सहज हे पॅनल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल.
सोलर पॅनल ची खरेदी कशी कराल?
सोलर पॅनल खरेदी करतात तुम्हाला सर्वात आधी राज्य सरकारच्या रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट ऍथॉरिटी ला संपर्क साधावा लागणार आहे. तुमच्या जवळच्या मोठ्या शहरांमध्ये याचं कार्यालय नक्कीच असेल. तसेच मोठ्या शहरांमध्ये काही खाजगी डीलर्सकडेही सोलर पॅनल तुम्हाला मिळू शकतील. सबसिडीचा अर्ज तुम्हाला अथोरिटी च्या कार्यालयातच मिळेल. तसेच या करता कर्ज घ्यायचे असेल, तर आधी कार्यालयात जाऊन त्याबाबतची माहिती द्यावी लागेल. अशा पद्धतीने तुम्ही फक्त 70 हजार रुपयांमध्ये नवा व्यवसाय सुरू करू शकाल आणि 25 वर्षांपर्यंत यामधून तुम्हाला उत्पन्न मिळू शकेल.
लेख आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि हो आमच्या आई मराठी Aai Marathi आणि योगा टिप्स Health Tips in Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या
सोलर
सोलर वॉटर पार्क