CLOSE AD

सातबारा उताऱ्यात मोठे बदल , जाणून घ्या कोणते बदल करण्यात आले?

Published On: March 31, 2026
Saatbara Utara Big Changes

Saatbara Utara Big Changes : मित्रांनो राज्यात जमीन नोंदणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत असून, आता सातबारा उताऱ्यावर केवळ जमीन क्षेत्रच नव्हे, तर त्यावरील पोट हिस्सा देखील स्पष्टपणे नोंदवला जाणार आहे. महसूल विभागाने यासाठी राज्यातील १८ तालुक्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी

या उपक्रमांतर्गत प्रत्येक महसूल विभागातील तीन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितले की, आतापर्यंत भावकीतील वाटणी किंवा पोट हिस्सा केवळ कागदोपत्री राहायचा. त्यामुळे अनेकदा वाद निर्माण होत असत. परंतु आता हे सर्व विवरण सातबाऱ्यावर स्पष्टपणे दिसणार असल्यामुळे नोंदणी आणि पारदर्शकता दोन्ही सुनिश्चित होतील.

पोट हिस्सा नोंदणीसाठी प्रक्रिया आणि शुल्क

भावांमध्ये झालेली जमीन वाटणी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता येईल. त्यानंतर संबंधित पोट हिस्स्याचे मोजमाप करून २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय किमान एक गुंठा क्षेत्रफळ असलेली जमीन देखील स्वतंत्रपणे नोंदवता येणार आहे.

आधी मोजणी, मग नोंदणी

या नव्या प्रक्रियेमुळे आधी मोजणी, मग नोंदणी असा स्पष्ट आणि कायदेशीर मार्ग तयार होईल. यामुळे भावकीतील जमीन वाटप अधिक कायदेशीर होईल आणि भविष्यातील वाद टाळता येतील.

डिजिटायझेशनमुळे वादांमध्ये घट

डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्यातील सुमारे ७० टक्के गावांचे नकाशे आणि जमीन नोंदी डिजिटायझ करण्यात आल्या आहेत. यामुळे शेत रस्ते, बांध, पांदण रस्ते यांसारख्या मर्यादा स्पष्ट होत असून, त्यामुळे संबंधित वादांमध्ये लक्षणीय घट होणार आहे.

पांदण रस्त्यांची किमान रुंदी निश्चित

पांदण रस्त्यांबाबत नवी अट लागू करण्यात येणार असून, यानुसार अशा रस्त्यांची किमान रुंदी १२ फूट असावी, अशी अट शासन लागू करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीपर्यंत वादमुक्त प्रवेश मिळण्यास मदत होईल.

सुधारित नोंदणी प्रणालीचा राज्यभर विस्तार

राज्यातील जमीन व्यवस्थापन प्रणाली अधिक पारदर्शक आणि तंत्रस्नेही करण्याच्या दिशेने ही पायाभूत सुधारणा महत्त्वाची ठरणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांच्या नोंदी स्पष्ट करण्यासाठी आणि भावकीतील मालमत्तावाटणीतील वाद टाळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर ही प्रक्रिया संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment