CLOSE AD

महिला उद्योगिनी योजना : या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी 3 लाखाचे कर्ज मिळणार …..

Published On: March 24, 2026
Women Udyogini Yojana

Women Udyogini Yojana : नमस्कार मित्रांनो महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी शासनाने महिला उद्योगिनी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना व्यवसायासाठी भांडवलाची मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे आहे.

योजनेचा उद्देश

अनेक महिलांमध्ये कौशल्य असूनही आर्थिक अडचणींमुळे त्या व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. हा अडथळा लक्षात घेऊन शासनाने उद्योगिनी योजनेची अंमलबजावणी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

बिनव्याजी कर्जाची सुविधा

या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज लागत नाही. या कर्जाच्या रकमेवरील तीन टक्के व्याज केंद्र शासनाकडून आणि चार टक्के व्याज राज्य शासनाकडून भरले जाते. त्यामुळे महिलांना प्रत्यक्षात बिनव्याजी कर्ज मिळते.

कोणत्या व्यवसायांसाठी कर्ज मिळू शकते?

  • बांगड्या बनविणे
  • ब्युटी पार्लर
  • बेडशीट व टॉवेल तयार करणे
  • बुक बाईंडिंग व नोटबुक व्यवसाय
  • चहा-कॉफी पावडर तयार करणे
  • मसाले किंवा कापूस धागा तयार करणे
  • रोपवाटिका, दुग्धव्यवसाय
  • पोल्ट्री व्यवसाय
  • डायग्नोस्टिक लॅब
  • ड्राय क्लिनिंग
  • सुक्या मासळीचा व्यापार
  • कॅटरिंग
  • खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय

कोणाला बिनव्याजी कर्ज मिळेल?

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. इतर महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येतो, मात्र त्यांच्यासाठी अत्यल्प व्याजदर आकारला जातो.

योजनेच्या अटी आणि शर्ती

1) अर्जदार महिला १८ ते ४५ वयोगटातील असावी.
2) विधवा आणि निराधार महिलांसाठी वयोमर्यादा नाही.
3) कर्जासाठी कोणत्याही जामीनदाराची आवश्यकता नाही.
4) कर्जाची परतफेड ७ वर्षांच्या कालावधीत करावी लागते.
5) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी सध्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध नाही. इच्छुक आणि पात्र महिलांनी जवळच्या सरकारी किंवा खाजगी बँकेत जाऊन अर्ज सादर करावा. पंजाब नॅशनल बँक, सिंध बँक, सारस्वत बँक अशा बँका या योजनेसाठी अधिकृत आहेत.

महत्त्वाची माहिती

ही योजना महाराष्ट्रात लागू आहे. योजनेसंबंधी अधिक माहिती आणि अचूक मार्गदर्शनासाठी संबंधित बँकेत थेट संपर्क साधावा.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment