Aadhaar-Voter Card Link संसद मध्ये केंद्र सरकारने सादर केलेले निवडणूक कायदे म्हणजेच दुरुस्ती विधेयक 2021 Election Laws Amendment Bill 2021 लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे मात्र याला बसपा काँग्रेस या पक्षांनी विरोध केलेला आहे.
विधेयकामध्ये सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड हे मतदान कार्ड ची लिंक करण्याची तरतूद आहे. जर हा कायदा पास झाला तर मतदार यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आधार कार्ड मागण्याचा अधिकार असेल मात्र सध्या विधेयकामध्ये आधार कार्डचा क्रमांक देणे हे संपुर्णरित्या ठेवण्यात आलेला आहे याचा अर्थ सध्या तरी ते बंधनकारक असणार नाही. सरकारच्या मते निवडणुकीमध्ये बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी येत असल्याकारणाने मतदार कार्ड आधार कार्ड लिंक केल्याने बोगस मतदान होणे थांबेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदार ओळखपत्र आधार कार्ड ची लिंक करण्यासाठी परवानगी दिलेली आहे मतदान कार्ड आणि आधार कार्ड Aadhaar-Voter Card Link एकमेकांना लिंक करणे खूपच सोपे असून ते आपण घरबसल्या ऑनलाइन करू शकतो.
मोबाईल द्वारे ऑनलाईन करू शकता लिंक
सर्वप्रथम आपल्याला https://voteportal.eci.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक, ईमेल, मतदार आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर राज्य आपला जिल्हा यासह वैयक्तिक माहिती भरा आणि नंतर दिलेल्या Search बटनावर क्लिक करा.
तुमची माहिती सरकारी आकडेवारी जोडली तर एक नवीन माहिती तुमच्यासमोर उघडेल तुम्हाला तिथे Feed Aadhaar Number हे ऑप्शन ला क्लिक करून येथे आधार सोबत विचारण्यात आलेल्या इतर गोष्टी टाकाव्या लागतील आणि नंतर सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
एसएमएस (SMS) करून करू शकता लिंक
आधार आणि मतदान कार्ड लिंक करण्याकरता >Voter ID No Aadhar No असा मेसेज टाईप करून 166 किंवा 51969 या नंबर वर पाठवा किंवा 1950 या नंबर वर कॉल करा आपण फोन द्वारे सुद्धा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण कॉल करू शकता आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना लिंक करण्याकरता आपण ऑनलाईन वापर करू शकता एस एम एस करू शकता किंवा कॉल देखील कॉल करता यापैकी जो पर्याय तुम्हाला योग्य वाटेल तो निवडून तुम्ही Aadhaar-Voter Card Link करू शकता. तुम्ही आमच्या आई मराठी आणि अद्भुत मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या
I am vaibhav panduarg waghmare Adhaer carkdae ilke open hote nay mg kay
राहणार आवलगाव
राहणार आवलगाव
बैल पोळा निबंध आणि माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नक्की वाचा..
Sanjay yadav