महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बाजारभावाची माहिती शेतकरी घरबसल्या मिळू शकतो. त्याकरिता बाजार भाव app विकसित केल्या गेले आहे. शेतकऱ्यांची बरेचदा पिकांच्या बाबतीत फसवणूक होते आणि ही फसवणूक व्यापारी किंवा ठेकेदारांकडून होत असते. आजचे बाजारभाव आपण पाहू शकतो.
शेतीमाल बाजार भाव 2020
आपण वरील प्रमाणे search करून रोजचे भाव पाहले तर फसवणूक होणार नाही. असं का होते? तर शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकाला काय भाव चालू आहे. याची माहिती नसते. ही माहिती मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना कोठेही जाण्याची गरज नाही.
पिकांच्या भावाविषयी घर बसल्या बसल्या शेतकरी माहिती पाहू शकतो. तो त्यातून आपल्या पिकांचा अंदाज बांधू शकतो आणि पीक कोणतं घ्यायचं हे देखील ठरू शकतो. बाजार भावाचे चढ-उताराचे आकडे, बाजारभाव कोठे लागतो हे लक्षात घेऊन शेतकरी पुढील वर्षासाठी किंवा पुढील पिकासाठी त्याचे नियोजन करू शकतो.
पिकांचे बाजारभाव मोबाईल मध्ये पाहण्यासाठी सर्वप्रथम काय करायचे, तर तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या क्रुम नावाचं हे ब्राऊजर ओपन करून घ्या. हे ब्राउझर उपलब्ध नसेल तर प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून घ्या.
हे ब्राऊजर तुमच्या मोबाईल मध्ये असतेच हे ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसतो. त्या बॉक्समध्ये बाजार भाव असे टाईप करावे किंवा मग सर्चच्या बाजूला एक माईक दिसतो.
माइक वर टच करून तिथं बाजारभाव असं बोललं तरी ते त्यामध्ये येऊन जाईल. हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ॲग्रोवन(agrowone.com) नावाची एक ऑफिसियल वेबसाइट पाहायला मिळेल. बाजार भाव वेगवेगळ्या जिल्ह्यातील बाजार भाव तुम्हाला येथे पहायला मिळतील.
तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा बाजार भाव पहायचा आहे जसे औरंगाबाद, बुलढाणा, बाजार भाव पुणे, बाजारभाव मुंबई असेल, बाजार भाव नाशिक असेल, बाजार भाव आजचे असतील, तर तुम्हाला त्या जिल्हा वरती टच करायचा आहे. जिल्ह्यावर टच केल्यानंतर तुम्हाला एका शेतमाल म्हणून ऑप्शन येणार आहे. त्यामध्ये मग शेतमाला पैकी कोणत्या वस्तूचा भाव पहायचा आहे. जसे बाजार भाव सोयाबीन,तूर, ज्वारी, गहू या सर्व वस्तूंचा किंवा मालाचा भाव शेतकरी घरबसल्या मोबाईल वर पाहू शकतो.
या वेबसाइटवर दररोजचे भाव अपडेट झालेले असतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या दिवसाचा बाजार भाव पाहायचा आहे. ते सुद्धा आपल्याला कळू शकते. उदाहरणार्थ आपण तुर भाव घेतला असेल तर तुरीच्या कोणत्या जातीला कोणता भाव आहे किंवा गहू घेतला असेल तर गव्हाच्या कोणत्या जातीला कोणता भाव आहे.
हे सर्व तिथं व्यवस्थित मांडलेले असते. अशाप्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या मोबाईल वरती वस्तूंचे किंवा शेतमालाचे बाजारभाव आपण पाहू शकतो. बाजार भाव महाराष्ट्र सरकार वेळोवेळी अपडेट करत असते. त्याची माहिती आपण रोज पाहतो.
😂hi
Well
Hi
At post.Ekala tq Mukhed Dist Nanded