Thibak Sinchan Yojana Drip Irrigation Subsidy शेतकरी मित्रांनो सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80% ते 75% असे एकूण अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. 6 जानेवारी 2022 ला शासन निर्णय मध्ये म्हटल्या प्रमाणे सन 2021-22 मध्ये मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना करता 200 कोटी निधी वितरित करणे बाबत.
राज्यामधील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोयी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शासन सिंचन योजना राबविण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती.
त्यानंतर सदर योजना सन 2021-22 पासून राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना पाच हेक्टर च्या मर्यादित 45% टक्के अनुदान देण्यात येते. सदर अनुज्ञेय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना 30% अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80% व 75% एकूण अनुदान देण्याचा शासनाने 6 जानेवारी 2022 रोजी निर्णय घेतलेला आहे.
सन 2021-22 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत रुपये 200 कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास अनुसरून शासनाने आता 6 जानेवारी 2022 ला पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय
1. सन 2021-22 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना करता रुपये 200 कोटी निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे.
2. या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया महाडीबीटी व पी एम एफ एस प्रणालीद्वारे करण्यात यावी या शासन निर्णयान्वये वितरित केलेला निधी सन 2021-22 मध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान देण्याकरता विनियोगात आणावा.
अशाप्रकारे मित्रांनो आता तुषार व ठिबक सिंचनास 80% व 75% अनुदान मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो आपण महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकता. आणि हो आमच्या आई मराठी आणि अद्भुत मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.