श्री माननीय नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना राबवली आहे ती म्हणजे कृषी सिंचन योजना महाराष्ट्र ,२०२२
या योजनेमध्ये सिंचन पद्धतीला वाव देण्यात आला आहे जेणेकरून शेतीला पाणी मिळावं व पीक फुलाव . त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होईल. या योजनेच्या मागेही खूप मोठे कारण आहे जसे की पाणी वाया न गमावता पिकाच्या झाडांच्या मुळांलगत नळीद्वारे थेंब थेंब पाणी देण्यासाठी अनुदान आहे जेणेकरून पाणीही वाचविले जाईल व झाडांना पाणी देखील मिळेल. हीच पद्धत म्हणजे आधुनिक ठिंबक सिंचन होय. यामध्ये खूप कमी वेगाने पाणी दिल्या जाते व ते पाणी पिकासाठी पूरक असते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र आघाडीवर असून भारतातील 60 टक्के ठिंबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रामध्ये होते. या योजनेसाठी 48 लाख अशी रक्कम मंजूर केली आहे यामधील 40 हजार लाख सुषम सिंचनासाठी आहे . आठ हजार लाख निधी पाणीसाठा साठी आहे.