Us Todani Yantra Anudan Yojana 2023 | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती , मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत . आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी उसाची पेरणी केल्या जाते आणि याने मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होते . तर मित्रांनो याची पेरणी केल्यानंतर कापणीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे हाल होतात कारण ऊस तोडणी साठी कामगार सापडत नाहीत आणि सापडले तरीही त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर किंमत मोजावी लागते.

ऊस तोडणी जर करायची असेल तर कामगारांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आणि कामालाही वेळ लागतो अशा ठिकाणी पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते कारण तोडणीत मोठ्या प्रमाणावर पीक हे खराब होते.

तर आता शासनाकडून एक योजना राबविली जात आहे ज्याच्या मार्फत ऊस तोडणी यंत्र शेतकरी मित्रांना अनुदानामार्फत दिल्या जात आहे . मित्रांनो अति महत्त्वाची बातमी म्हणजे यासाठी 35 लाख रुपये अनुदान यासाठी मिळत आहे. खूपदा शेतकरी मित्रांना कापणीसाठी मजूर मिळत नाही त्यामुळे पीक हे खराब होते आणि मोठ्या प्रमाणावर तोटा होतो आणि यामुळे पिकाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते यासाठी आता शासनाकडून ऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी 35 लाखाचे अनुदान मिळत आहे.

Read  जैविक खत | jaivik sheti

ऊस तोडणी यंत्राला केन हार्वेस्टर असेही म्हणले जाते. तर मित्रांनो आता हे यंत्र घेण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे . याच्या माध्यमातून एक दिवसात 30 एकर पर्यंत काढणं होणार आहे , यामुळे आपला पैसाही बसणार आहे आणि वेळही कमी लागणार आहे.

लाभ कोणाला मिळणार आहे ?

मित्रांनो जे शेतकरी मित्र स्वतःचे शेती आहे, किंवा साखर उद्योजक आहेत, उद्योजक असतील, शेतकरी उत्पादन संस्था, याप्रमाणे या यंत्राचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Comment