Rashtriya Ann Sursksha Abhiyan 2022 | राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान 2022

Rashtriya Ann Sursksha Abhiyan 2022 शेतकरी मत मित्रांनो आपल्या देशामध्ये तेलबिया, कडधान्ये अन्नधान्य व पोषक तृणधान्य, भरडधान्य या पिकांची वाढ व्हावी लागवड व्हावी आणि शेतकऱ्यांना अशा पिकांच्या लागवडीकरता प्रोत्साहन मिळावं याकरता देशांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे पंप असंच अनुदानावर बी बियाणे वितरण, कृषी अवजारे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे सूक्ष्म मूलद्रव्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच पिक संरक्षण औषधे व जैविक घटक तसेच तणनाशके या घटकांनाही अनुदान दिले जात असतो केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या 2007- 08 पासून अन्न सुरक्षा अभियाना मध्ये वाढ झालेली आहे आता या योजनेअंतर्गत शेतीच्या लागवडीकरता आवश्यक असणारी बी-बियाणे पुरवण्यात येणार आहेत. बियाणेही चांगल्या दर्जाचे असतील तर शेतामधून चांगले उत्पन्न निघेल त्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांकरिता ही योजना सुरु केली आहे या योजनेमध्ये सरकारने वेगवेगळ्या भागांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना पीक निहाय बी-बियाणांची वाटप खतांचे वाटप ठरवलेले आहे.

भाताची शेती ही प्रामुख्याने नागपूर, सातारा, पुणे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये केली जाते या 8 जिल्ह्यांची भातशेतीसाठी निवड करण्यात आली आहे.

Read  Kusum Solar Pump Online Registration | कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन .

गहू या पिकाकरिता बीड, नागपूर, सोलापूर अशा तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

भरड धन्याकरिता मका या पिकासाठी राज्यातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये अमदनगर, जालना, नाशिक, सांगली, धुळे, जळगाव, औरंगाबाद इत्यादींचा समावेश आहे.

कडधान्य याकरिता राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पौष्टिक तृणधान्य याकरिता पोस्टीक धान्य ज्वारी, बाजरी, रागी इत्यादींचा समावेश आहे यामध्ये नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ अशा 23 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे

बाजरी करिता अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली अशा 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

तर रागी करिता पुणे, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, सातारा पालघर सह रायगड व रत्नागिरी या सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

तर कापसा करिता अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशीम, चंद्रपूर, नागपूर वर्धा यवतमाळ अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Read  Mukhyamantri Saur Pump Krishi Pump Yojana 2023 | मुख्यमंत्री सौर पंप कृषी पंप योजना 2023.

ऊसा करिता बीड, जालना, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद नांदेड, परभणी आणि हिंगोली चा समावेश करण्यात आलेला आहे.

प्रमाणित बियाणे वितरण अनुदान

दहा वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे वितरण किमतीच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 2500 प्रतिक्विंटल अनुदान

दहा वर्षाच्या आतील अधिसूचित वाहनांचे प्रमाणित बियाणे किमतीच्या 50% किंवा कमाल 5000 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान

बियाणे उत्पादनाकरिता अर्थसहाय्य दहा वर्षाच्या आतील बियाणं करिता दोन हजार पाचशे प्रति क्विंटल असे अनुदान दिले जाणार आहे.

कृषी अवजारांचे करता अनुदान

यामध्ये कृषी अवजार खरेदी करता महिलांसाठी तसेच एससी-एसटी व अल्पभूधारक शेतकऱ्यांना 35 बी एच पी पेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्‍टरचलित अवजारांना करिता.

पेरणी यंत्रव – 20000 रुपये

रिज फरो प्लांटर – 75000

बहुपिक मळणी यंत्र – 250000

रोटा व्हेटर – 50400

इतर प्रवर्गातील शेतकरी 40 टक्के अनुदानासाठी पात्र असतील तर कृषी अवजारे करिता महिला एसीएसटी अल्पभूधारक शेतकऱ्यांना 35 एचपी पेक्षा जास्त क्षमतेच्या पावर टिलर साठी 70 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे याप्रमाणे या योजनेमध्ये महिला गट शेतकरी गटांना दालमिल करिता प्रत्यक्ष खर्चाच्या 60 टक्के किंवा 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

Read  National Food Security Mission Subsidy | खते व औषधांचा करिता शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान

एकात्मिक अन्नधान्य व्यवस्थापन अनुदान

यामध्ये सूक्ष्म मूलद्रव्ये गंधक जिप्सम जैविक खते या बाबींचा समावेश आहे सूक्ष्म मूलद्रव्याचा वापराकरिता किमतीच्या 50% किंवा कमाल 500 प्रति हेक्‍टर इतके अनुदान दिले जाते,

याकरिता शेतकरी गटाने शिफारशी प्रमाणे सूक्ष्म मूलद्रव्य व खुल्या बाजारातून खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा होणार आहे.

मात्र अनुदाना करता वस्तू किंवा सेवा कर प्राप्त क्रमांक असलेली खरेदी पावती सादर करणे बंधनकारक राहील एका लाभार्थी शेतकरी यांना एक वर्षात सर्व बाबी मिळून जास्तीत जास्त पाच हजार पर्यंत लाभ घेता येणार आहे

आवश्यक कागदपत्रे

* 8 अ 

* सातबारा

* केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र पंपा करिता

* खरेदी करण्याचे साधन किंवा उपकरणांचे कोटेशन पंप पाईप आणि शेततळे या घटकांत करता लागेल.

* हमीपत्र

* पूर्व संमती पत्र

* अनुसूचित जमाती / जाती यांकरिता जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास.

 

Leave a Comment