National Food Security Mission Subsidy | खते व औषधांचा करिता शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान

National Food Security Mission Subsidy – केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते निविष्ठा अनुदान देण्याकरता एक महत्त्वपूर्ण योजना राबविली जाते, त्याचं नाव आहे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तर शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे जैविक खते तननाशक जिप्सम अशा विविध बाबींचा खरेदीकरिता दिल्या जाणाऱ्या अनुदाना संदर्भातील एक माहिती आपण बघूया.

खरीप व रब्बी हंगामाकरिता खते आणि औषधांच्या खरेदी करता 50 टक्के अनुदान दिले जात आहे त्याकरता आता अर्ज मागवण्यात आले आहेत अभियाना सोबत देशात राष्ट्रीय खाद्य तेल अभियान देखील राबवली जात आहे.

लाभ कसा मिळणार?

शेतकरी जिप्सम सूक्ष्म मूलद्रव्य जैविक खत रेदी करू शकतात एकूण किमतीच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 500 रुपयांच्या मर्यादेत दोन हेक्‍टर साठी देय आहे तसेच तणनाशक, पीक संरक्षण, औषधे जैविक कीड नियंत्रण इत्यादी किमतीच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 500 रुपये हेक्‍टरसाठी देणे आहे, तर अशाप्रकारे शेतकऱ्यांना कमाल दोन हेक्टर मर्यादेत देय आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना निविष्ठा किंमतीच्या 50% व जास्तीत जास्त 500 रु प्रति हेक्टर याप्रमाणे लाभ मिळणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वर्षामध्ये या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे.

Read  Free Scooty Yojana 2023 Maharashtra | फ्री स्कूटर योजना २०२३ .

कोणती कागदपत्रे लागतील?

आधार कार्ड व बँक खात्याचा तपशील सातबारा निविष्ठा खरेदी करून त्याची खरेदी पावती ही कागदपत्र खरीप हंगामाकरिता 15 सप्टेंबर 2022 पूर्वी व रब्बी हंगामाकरिता 30 डिसेंबर 2022 पूर्वी सादर करावे लागणार आहेत.

National Food Security Mission Subsidy ही पोस्ट मला आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या आई मराठी या ब्लॉग ला सुद्धा अवश्य भेट द्या.

 

Leave a Comment