Gram Ujala Yojana 2022 | ग्राम उजाला योजना

Gram Ujala Yojana 2022 केंद्र सरकार ग्राम उजाला योजनेंतर्गत केवळ 10 रुपयांमध्ये एलईडी LED बल्ब देत आहे. आतापर्यंत 50 लाखांहून अधिक एलईडी बल्बचे वाटप करण्यात आलेले आहे.

सरकारी कंपनी CESL च्या माध्यमातुन ग्राम उजाला योजनेंतर्गत 50 लाख एलईडी बल्ब वितरीत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी (Gram Ujala Yojana) केली आहे. योजना ग्रामीण भागात सीईएसएलने या वर्षी मार्चमध्ये खेड्यापाड्यात 10 रुपयांच्या किमतीत एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी योजना सुरू केली होती. याच महिन्यात, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, 2021 च्या निमित्ताने, CESL ने एकाच दिवसात 10 लाख एलईडी बल्ब वितरित करण्याचे महत्त्वाचे लक्ष्य गाठले. ग्राम उजाला योजना काय आहे CESL पारंपरिक बल्बच्या बदल्यात 3 वर्षांच्या हमीसह उच्च दर्जाचे 7W आणि 12W LED Bulb प्रदान करत आहे.

Read  Indian Tea Recipe तुम्ही बनवलेला चहा सर्वांना आवडेल

या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त 5 बल्ब मिळू शकणार आहेत.  ग्रामीण भागात प्रतिवर्षी 71 कोटी युनिटपेक्षा जास्त विजेची बचत होईल, असा अंदाज आहे. यामुळे खर्चाच्या स्वरूपात वार्षिक सुमारे 250 कोटी रुपयांची बचत होईल.

हा कार्यक्रम 31 मार्च 2022 पर्यंत चालेल. CESL कंपनीचे सीईओ महुआ आचार्य म्हणाले की, “ग्रामीण पर्यावरणाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जात आहे. कार्बन क्रेडिटच्या आर्थिक मॉडेलवर काम करत आहे. अपेक्षित लक्ष्य पूर्ण झाल्यावर आम्ही हा कार्यक्रम इतर राज्यांतील गावांमध्ये विस्तारित करू.” असे ऊर्जा मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) ची उपकंपनी असलेल्या CESL ने ही कामगिरी केली आहे. ग्राम उजाला योजना सध्या बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील ग्रामीण भागांमध्ये राबविण्यात येत आहे. आता ही योजना महाराष्ट्र मध्ये सुद्धा राबवली जाणार आहे.

Leave a Comment