Covid 19 Corona Omicron Lockdown in Maharashtra 2022| राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले उत्तर!

Covid 19 Corona Omicron Lockdown in Maharashtra 2022 काही दिवसांपासून राज्यांमध्ये करून संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे तसेच ओमायक्रोन चार रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे त्यामुळे आता राज्य सरकारकडून त्यावर कठोर निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.

आताच्या घडीला बघितलं तर काही प्रमाणात सरकारने निर्बंध लावले आहेत मात्र दररोज वाढणारी रुग्ण संख्या ही सरकारला एक सावधगिरीचा इशारा चाहे या पार्श्वभूमीवर आता राज्यांमध्ये पुन्हा एकदा लागणार का असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना निर्माण झाला आहे यामुळे यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे की,

“लॉकडाऊन सध्याच लागणार नाही, आम्ही काल मुख्यमंत्र्यांशी प्रदीर्घ आरोग्य विभाग टास्क फोर्सच्या बाबतीत बोललो, सध्या लॉकडाऊनची कुठलीही चर्चा नाही.  निर्बंध जरूर वाढवले पाहिजेत परंतु त्यांची भाषा ही आम्ही त्याच वेळी केली की, ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल त्याच दिवशी ऑटो मोड मध्ये लोक डाऊन होईल. अशापद्धतीने ठरवण्यात आलेले आहे त्यामुळे आज एवढ्या लवकर लॉक डाऊनचा काही विषय नाही. नक्कीच संख्या वाढते आहे. हे खर आहे.”

Read  Omicron Variant of Coronavirus in Maharashtra | कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये काय सुरू काय बंद?

“लॉकडाऊन चा असर थेट अर्थकारणावर होत असतो हातावर पोट भरणारे असो किंवा गरीब असो कारण प्रत्येक माणसाला लॉकडाऊनची झळ पोहोचलेली आहे. सध्या निर्बंधांचा बाबतीत नक्कीच कठोर कार्यवाही करण्याचे काम सुरू झालेला आहे. बेस्टची उपलब्धता आणि ऑक्सिजनचा वापर या दोन्ही गोष्टींवरून पुढे निर्णय घेतले जातील.”

“सध्या रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू केले आहेत त्याची कठोर पद्धतीने अंमलबजावणी करणे हा एक शासना समोर आव्हानात्मक विषय नक्कीच आहे. संक्रमण होऊ नये किंवा संसर्ग अधिक वाढू नये या दृष्टिकोनातून उपाय करणं एक शासनाचा प्रथम प्राधान्य आहे.”असे सुद्धा आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

 

Leave a Comment