Jamin Kharedi Anudan Yojana 2022 | जमीन खरेदी अनुदान योजना | दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

Jamin Kharedi Anudan Yojana 2022 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना खरेदी करावयाच्या जमिनीच्या किमतीबाबत व मार्गदर्शक तत्वे विहित करणे बाबत महाराष्ट्र शासनाने 14 ऑगस्ट 2018 मध्ये एक शासन निर्णय काढला होता. भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतमजुरांना आता या शासन निर्णयाने शेतजमीन मिळणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या या शासन निर्णयाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची आता अंमलबजावणी करण्यात येत आहे सन 202 सण 2022-23 या वर्षांमध्ये अर्थसंकल्पीत करण्यात आलेला निधी खर्च करण्याकरता आता शासनाने मान्यता दिलेली आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमीहीन कुटुंबांना जमीन खरेदी करण्याकरता राबविण्यात येणार आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आता मुलाखत बदल केले असून ही योजना आता 100 टक्के अनुदानाची करण्यात आलेली आहे.

Read  Mahaawas Abhiyan Gramin 2021 महा वास अभियान ग्रामीण

किती लाभ मिळणार?

या योजने करता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर, परित्यक्त्या महिला, विधवा महिला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीडित लाभार्थी यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून राहणीमानाचे दर्जा सुधारावा याकरिता शंभर टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन लाभार्थ्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे

या योजने करता पात्रता

या योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देणे करिता सन 2022 मधील शासकीय रेडीरेकनरच्या दराप्रमाणे जमीन खरेदी करावयाची असल्यास ज्या शेतकऱ्यांना सन 2022 मधील शासकीय रेडी रेकनर दराप्रमाणे वैयक्तिक संयुक्त मालकीची शेतजमीन सामाजिक न्याय विभागास विक्री करावयाची आहे.

Read  BSF Constable Tradesman Recruitment 2022 Online Form | बी एस एफ भरती 2022

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

5 सप्टेंबर 2022 चा शासन निर्णय

लाभार्थ्यांनी स्वतः कार्यालयात अर्ज याबाबत करायचा आहे. ज्या गावात जमीन उपलब्ध आहे त्याच गावातील अनुसूचित जातीचे भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील त्याच गावाचा रहिवासी असलेले 18 ते 60 वयोगटातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्या गावात लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. लगतच्या गावातही लाभार्थी उपलब्ध नसल्यास तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्यांचा विचार करण्यात येणार आहे. यामध्ये अंतिमतः परिस्थितीनुसार आवश्यक ते निर्णय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती घेणार आहेत.

पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्याही बाहेर व्यक्तीद्वारे योजनेचा लाभ घेऊ नये. या कार्यालया मार्फत कोणत्याही बाह्य व्यक्तीशी नेमणूक केलेली नाही. लाभार्थ्यांनी किंवा शेतमालकाने परस्पर बाहेर व्यक्तीद्वारे योजनेबद्दल व्यवहार केल्यास व त्यास फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.

Read  How to Update Ration Card | राशन कार्ड मध्ये नवीन व्यक्तीचे नाव कसे जोडावे?

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेची माहिती मिळण्या करिता समाज कल्याण कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन निमवाडी, अकोला येथे संपर्क साधावा अशाप्रकारे आव्हान समाज कल्याण कार्यालयाद्वारे करण्यात येत आहे.

लागणारी कागदपत्रे

अर्जाचा नमुना

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
error: Content is protected !!