New Aadhar Center Registration 2021 मित्रांनो जर आपल्याला नवीन आधार सेवा केंद्र याकरता अर्ज करायचा असेल तर हा लेख आपल्या करता आहे.
परभणी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत करतात तात्पुरत्या स्वरूपामध्ये आधार सेवा केंद्र करता लागणाऱ्या किटच्या वाटपासंबंधी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
आधार कार्ड हे कागदपत्र सर्वांकरता आवश्यक आहे आणि तेवढंच महत्त्वाचं सुद्धा. म्हणून नवीन आधार कार्ड बनवण्याकरता किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता आपल्याला आधार कार्ड सेंटर ची आवश्यकता असते. परंतु बऱ्याच वेळा आपण बघतो की आधार कार्ड सेंटर हे आपल्या पासून फार लांब असते आणि त्यामुळे आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आपले सरकार सेवा केंद्र हे जवळ असणं खूप महत्वाचे आहे.
म्हणूनच जिल्हाधिकारी कार्यालया मधून आधार सेवा केंद्र किटचे वाटप केल्या जात असते. याकरता आता परभणी आणि कोल्हापूर या जिल्ह्यात करता जाहिरात काढण्यात आलेले आहे. परभणी जिल्हा करता 17 ठिकाणी हे आधार सेवा केंद्र वाटप केले जाणार आहे. ज्या करता 24-11-2021 पूर्वी आपण अर्ज करणे आवश्यक आहे. ह्या करताना जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अर्ज करणे आवश्यक आहे. याकरता जे केंद्रसंचालक अर्ज करतील त्यांच्या करता मॉनिटर, लॅपटॉप, फिंगरप्रिंट स्कॅनर, वेब कॅमेरा, GPS.
कोल्हापूर जिल्हा करता एक नोव्हेंबर 2021 ते 10 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये स्वतःचे खाजगी आधार असंच असणाऱ्या इच्छुक ग्रामपंचायत अथवा आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर टपाल शाखा येथे समक्ष कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक आहे. https://Kolhapur.gov.in या संकेत स्थळावर अधिक ची माहिती आपल्याला मिळू शकेल कोल्हापूर जिल्हा करता 70 जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
इतरही जिल्ह्यात करता अशा स्वरूपात अर्ज लवकरच मागवण्यात येतील अशा प्रकारची आशा आहे.