How to Update Ration Card राशन कार्ड आपल्या सर्वां करताच खूप महत्त्वाचे आहे कारण राशन काढणे आपण राशन घेऊ शकतो तसेच ते आपला एक ओळखीचा पुरावा देखील आहे कुठे सरकारी कार्यालय असो किंवा आपल्या कुटुंबाचा पुरावा असो तो जर द्यायचा असेल तर आपल्याला राशन कार्ड खूप साहाय्यभूत ठरते.
राशन कार्ड हे राज्य सरकार कडून बनवले जात असल्याकारणाने ते आधार कार्ड सोबत लिंक आहे. ज्यामध्ये आपल्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या अंगठ्याच्या स्कॅन द्वारे आपण आपल्या कुटुंबाचे महिन्याचे राशन घेऊ शकतो. कारण सरकारने आता देशभरामध्ये आपल्याला कोठेही राशन मिळेल अशी व्यवस्था केली आहे. परंतु आपल्या घरामध्ये एखादा नवीन सदस्य जर आला तर त्याचे नाव आपण राशन कार्ड मध्ये कसे जोडू शकतो हे आपल्याला माहिती नसते म्हणून या लेखामध्ये मी आपल्याला आपल्या कुटुंबातील नवीन सदस्य आपल्या राशन कार्ड मध्ये कसा जोडता येईल? हे पाहणार आहोत.
नवीन व्यक्तीचे नाव ऑनलाईन कसे जोडावे?
सर्वप्रथम आपल्याला आपल्या राज्यातील अन्न व पुरवठा विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
तुम्ही प्रथमच या वेबसाईटला व्हिजिट करत असाल तर एक लॉगिन आयडी पासवर्ड बनवा लागेल.
त्यानंतर होम पेज वर तुम्हाला नवीन सदस्य जोडण्याचा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक करून आता एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल
त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्यांची सर्व माहिती योग्यरीत्या भरावी लागेल.
फॉर्म भरतानी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची सोफ्टकॉपी अपलोड करावी लागेल.
समिती या बटणावर क्लिक केल्यानंतर नोंदणी क्रमांक दिला जाईल.
अशाप्रकारे तुम्ही या पोर्टल वर तुमचा फॉर्म भरून तो ट्रॅक करू शकता.
अधिकारीवर्ग तुमचे कागदपत्र तपासतील जर सर्व ठीक असेल तर तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल आणि पोस्टाद्वारे तुमच्या घरी रेशन कार्ड मिळेल.
ऑफलाइन पद्धतीने कशी नोंदणी करावी?
प्रथम नवीन नाव नोंदणी करता जवळच्या अन्नपुरवठा केंद्रात जावे लागेल.
सर्व कागदपत्रे सोबत ठेवा त्याची एकेक प्रत फॉर्म सोबत जोडा.
दिलेल्या फॉर्म मध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरा.
नवा सदस्य नाव नोंदणी अर्ज दिल्यानंतर ठराविक शुल्क देखील आपल्याला भरावे लागेल.
अर्ज अधिकाऱ्याला दिल्यानंतर एक पोचपावती मिळेल ती जपून ठेवा.
या पावती द्वारे आपण ऑनलाईन अर्जाची तपासणी करू शकता.
तुमचे नवीन रेशन कार्ड किमान दोन आठवड्याच्या तुमच्या घरी येईल.
अशाप्रकारे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपल्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव आपल्या राशन कार्ड मध्ये दाखल करू शकता.
तुम्हाला आमच्या आई मराठी व अद्भुत मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्यावीशी वाटेल तर नक्की भेट द्या.