PM Mandhan Yojana | एका पैशाचीही गुंतवणूक न करता शेतकऱ्यांना मिळवता येतील 36000 रुपये

शेतकऱ्यांना वर्षाकाठी 36,000 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी मोदी सरकार देत आहे. मोदी सरकारकडून तुम्हाला ही रक्कम पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत मिळत आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचा (pm mandhan yojana) लाभ देण्यात येणार आहे.

शेतकऱ्याला नेमके 36000 रुपये कसे मिळणार ते पाहुयात?

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली. यात शेतकऱ्यांना पेन्शन मिळतेय. आतापर्यंत 11 कोटी 71 लाख लोक या योजनेत सामील झालेत. केंद्र सरकार पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभही देत ​​आहे. योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. त्याच वेळी त्यात सामील झाल्यावर आपण आपल्या खिशातून कोणतेही पैसे न देता 36000 रुपये मिळविण्यास पात्र असू शकता.

Read  Free Ration Scheme 2022 | मोफत धान्य योजनेस मुदतवाढ

पैसे कसे मिळवायचे?

अल्पसंख्याक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा पीएम किसान योजनेंतर्गत दरमहा पेन्शन देण्याची योजना असून, त्यामध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये किंवा 36000 रुपये वार्षिक पेन्शन देण्यात येते. पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभामध्ये थेट हातभार लावण्यासाठी पर्याय निवडण्याची सुविधा आहे. अशा प्रकारे शेतकऱ्याला त्याच्या खिशातून थेट पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याचे प्रीमियम 6000 रुपयांमधून वजा केले जाईल. म्हणजेच खिशातून पैसे न घालताही शेतकऱ्याला वार्षिक 36000 रुपये मिळतात.

 आवश्यक कोणती कागदपत्रे द्यावी लागतील?

जर एखादा शेतकरी पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही, कारण अशा शेतकऱ्यांची संपूर्ण कागदपत्रे भारत सरकारकडे आहेत. त्यासाठी शेतकर्‍यास कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) जाऊन त्याची नोंदणी करून घ्यावी लागेल. नोंदणीसाठी आधार कार्ड आणि सातबाऱ्याची प्रत घ्यावी लागेल. दोन नोंदणीसाठी 2 छायाचित्रे आणि बँक पासबुक देखील आवश्यक असेल. नोंदणीसाठी शेतकऱ्याला स्वतंत्र फी भरावी लागणार नाही. नोंदणीदरम्यान शेतकऱ्याचा विशिष्ट पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड तयार केले जाईल.

Read  आता पेटीएमवर बुक करा सिलेंडर Book Cylinder on Paytm

या योजनेचा कोण फायदा घेऊ शकतो-

1) 18 ते 40 वर्षांचा कोणताही शेतकरी किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकेल.
2) यासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रावर शेतजमीन असावी.
3)आपल्याला किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे मासिक 55 रुपये ते 200 रुपयांपर्यंत योगदान द्यावे लागेल.
4) आपण वयाच्या 18 व्या वर्षी सामील असाल तर मासिक अंशदान दरमहा 55 रुपये असेल.
5) वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही या योजनेत सामील असाल तर तुम्हाला 110 रुपये जमा करावे लागतील.
6) वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही सामील असाल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतात.

 नोंदणी कशी करावी?

प्रधानमंत्री किसान योजना ऑनलाईन नोंदणी
करिता आपण अधिकृत सरकारी वेबसाईटवर अर्ज करू शकता. स्वतः नोंदणी करण्यासाठी https://maandhan.in/ या संकेतस्थळावर जावं लागेल.

Read  Drip Subsidy Maharashtra 2022 | ठिबक व तुषार सिंचन योजना

Source : tv9marathi

Leave a Comment