Kukkutpalan Anudan 2022 | कुकुटपालन अनुदान 2022

Kukkutpalan Anudan 2022 कुकुट पालना संबंधी आज आपल्या लेखामध्ये माहीती बघूया.  राज्यातील 302 तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातुन सघन कुक्कुट गटाची स्थापना करण्यात येत असते. याकरता ही योजना राबवली जाते ज्या करता प्रकल्प खर्च हा 10 लाख 27 हजार आहे. जे लाभार्थी याकरता पात्र होणार आहेत म्हणजेच एका तालुक्यातून एक पात्र लाभार्थी याकरिता प्रत्येक लाभार्थ्याला 5 लाख 25 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान याठिकाणी दिले जात असते.

मागच्या आठवड्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम. परंडा कळंब, तुळजापूर, उमरगा तालुक्याकरता अर्ज मागविण्यात आले आहेत. पत्रानुसार आता जळगाव जिल्ह्यामधील सात तालुक्यात करता अर्ज मागविण्यात आलेले आहे.  जळगाव जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातून खाजगी भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करायची आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात एका पात्र लाभार्थ्यांची निवड ही जिल्हा निवड समिती मार्फत करण्यात येणार आहे.

Read  Aadhaar-Voter Card Link | आधार आणि मतदान कार्ड लिंक कसे करायचे? जाणून घ्या सोपी पद्धती

तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी यांच्या जवळ आवश्यक व परिपूर्ण कागद कागदपत्रांसह 31 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज आपणास पंचायत समिती मध्ये मिळेल. या योजनेमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील सघन कुक्कुट विकास गटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत दहा लाख 27 हजार पाचशे रुपये असून सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये देणे आहे जी लाभार्थी सद्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत.  तसेच ज्या लाभार्थ्यांनी कडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.

आपल्या जिल्ह्यामध्ये योजना चालू आहे किंवा नाही याकरता पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.

Leave a Comment