group

Sainik School Satara Recruitment 2022 | सैनिक स्कूल सातारा भरती 2022

Sainik School Satara Recruitment 2022 सैनिक स्कूल सातारा येथे काही पदांकरिता भरती होणार आहे, याकरता अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

TGT, नर्सिंग असिस्टंट, वैद्यकीय अधिकारी, सामान्य कर्मचारी, वॉर्डबॉय, बँड मास्टर व संगीत टीचर या पदांकरिता भरती होणार आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.

TGT पद

या पदाकरिता अर्ज करणारा उमेदवार गणित किंवा हिंदी विषयांमध्ये पदवी घेतलेला असावा, तसेच या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या असणे गरजेचा आहे. या पदाकरिता पगार 44900 रुपये प्रति महिना असणार आहे.

Read  Covid 19 Corona Omicron Lockdown in Maharashtra 2022| राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले उत्तर!

नर्सिंग असिस्टंट (nursing assistant) पद

या पदाकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नर्सिंग मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतलेली असते आवश्यक आहे, तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असावे. त्या पदाला 25500 रुपये प्रति महिना पगार मिळेल.

सामान्य कर्मचारी (general employee) पद

या पदाकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलेले असावे. या पदाकरिता 18000 रुपये प्रति महिना पगार मिळेल.

वैद्यकीय अधिकारी (medical officer) पद

या पदाकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एमबीबीएस (MBBS) पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे, तसेच या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असावे. या 30000 रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.

वार्ड बॉय (ward boy) पद

या पदाकरिता अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण केलेले असावे तसेच या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलेले असावे. या पदाकरिता 25000 रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.

Read  Gramsabha Niyam in Marathi Language ग्रामसभा नियम व अटी

बँड मास्टर (band master) पद

या पदाकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने AEC training College मधून शिक्षण घेतलेला असावं तसेच उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असावे. या पदाकरिता पगार 20000 रुपये प्रति महिना असेल.

संगीत शिक्षक (music teacher) पद

या पदाकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने संगीताचा किमान पाच वर्षे शिक्षण घेतलेले असावें, तसेच या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असावे. या पदाकरिता प्रतिमहा 20000 रुपये पगार असेल.

आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल किंवा नोटिफिकेशन डाउनलोड करायचे असेल तर, आपण ऑनलाईन अप्लाय करू शकता. www.sainiksatara.org या लिंक वर क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकता.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

Resume (बायोडाटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट साईज फोटो.

Read  Corona Vaccine | 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना लस | कशी कराल नोंदणी

अर्ज करण्यासाठी पत्ता

प्राचार्य,

सैनिक स्कूल सातारा,

सातारा 415001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2022

Originally posted 2022-09-08 03:20:46.

group

3 thoughts on “Sainik School Satara Recruitment 2022 | सैनिक स्कूल सातारा भरती 2022”

Leave a Comment

x