PM Kisan Sanman Yojana 10th Installment List शेतकरी मित्रांनो लवकरच दावा हप्ता पीएम किसान सम्मान निधि योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या (Kisan Sanman Yojana) किसान सन्मान योजनेचा आता 10 वा हप्ता काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे.
15 डिसेंबरला 10 वा हप्ता लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जात होते. आता 16 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या 2000रू खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी या योजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रसिध्द करण्यात आलेल्या (List of Farmers) यादीत आपले नाव आहे का नाही याची तपासणी आता करता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून 10 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या अनुशंगाने यंत्रणा कामाला लागली आहे. आता अवघ्या काही दिवसांमध्ये ही 10 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यादीमध्ये नाव कसे शोधायचे?
1. सुरवातीला पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या https://pmkisan.gov.in/.या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला Formers Corner या नावाचा पर्याय समोर असणार आहे.
2. यामध्ये Beneficiary List म्हणजेच लाभार्थ्यांची यादी असणार आहे.
3. लाभार्थी यादीच्या पर्यायावर येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
4. नवीन पानावर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, बॅंक आणि गावाची माहिती भरावी लागणार आहे. अन्यथा केवळ आधार कार्ड, किंवा तुम्ही दिलेल्या बॅंकेचा खातेक्रमांक टाकला तरी सर्व तपशील समोर येणार आहे.
5. संपूर्ण यादीच नाही तर केवळ तुमचे नावच येणार असल्याने ही पध्दत सोपी आहे.
अशाप्रकारे शेतकरी वरील प्रमाणे यादी पाहता येईल.