group

How to Make Driving Licence Online Offline | ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसे काढावे?

How to Make Driving Licence Online Offline वाहन चालवण्यासाठी आधी शिकाऊ आणि नंतर पक्का असा परवाना लागतो. तर परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना देण्यात येतो. शिकवू ते आंतरराष्ट्रीय वाहन परवाना कसा काढणार हे आपण या लेखातून जाणून घेऊया.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते. तर पन्नास सीसी पेक्षा कमी इंजन क्षमतेची गीजरसह दुचाकी चालवण्यासाठी 16 वयाचे अर्जदार पालकांच्या संमतीने अर्ज करू शकतात. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अवजड वाहन चालवण्यासाठीच्या लायसन्ससाठी वयाची 20 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच हलके मोटार वाहन चालविण्याचा एक वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल तर त्याला शिकवू लायसन्ससाठी अर्ज करता येईल.

हे पण वाचा : Biographyof.in

Read  PM Kisan Yojana 13 Installment 2022 | पी एम किसान योजना १३ हप्ता २०२२ .

शिकावू लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे आपण पाहूया व त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

शिकाऊ लायसन साठी ऑनलाईन अपॉईंटमेंट रहिवाशी क्षेत्रातील परिवहन कार्यालयात मिळेल ऑनलाइन अपॉइंटमेंटसाठी 04023494777 हा मदत केंद्र दूरध्वनी क्रमांक कार्यालयीन वेळेत कार्यान्वित असतो.

आवश्यक कागदपत्रे

शारीरिक तंदुरुस्ती संदर्भात अर्ज आणि घोषणापत्र

शिकावू लायसन्ससाठी अर्ज

अर्जदाराच्या पारपत्र आकाराच्या छायाचित्रांच्या तीन प्रती

निवासाचा पुरावा, वयाचा पुरावा, नागरिकत्वाचा पुरावा, शुल्क.

पक्के लायसन्स चाचणी प्रक्रिया

चाचणी परीक्षा वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर चालकास परवाना देण्यात येतो.

Read  7 lakh Insurance From EPFO | नोकरदार असाल तर केंद्र सरकार कडून मिळेल 7 लाखांचा फायदा

जर चालक वाहन चालवण्याची चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो.

मोटार वाहन कायद्याच्या कलम सहा नुसार कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त स्थायी ड्रायव्हिंग लायसन्स ठेवता येत नाही.

आंतरराष्ट्रीय लायसन्स कसे काढावे?

आंतरराष्ट्रीय लायसन्स एका वर्षांपूर्ते मर्यादित असते. तसेच संयुक्त राष्ट्र परिषदेत स्वाक्षऱ्या केलेल्या देशांमध्ये वैध असते.

आंतरराष्ट्रीय परवाना कसा मिळेल?

नमुना 4 अर्ज

प्रमाणित प्रतीसह वैध वाहनचालक लायसन्स

प्रमाणित प्रतीसह पारपत्र

प्रमाणित प्रतीसह व्हिसा, वैद्यकीय प्रमाणपत्र.

शुल्काचा भरणा.

अर्जदाराने निवासी कार्यक्षेत्रात अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर करण्यापूर्वी लायसन्समध्ये पत्यासंदर्भात आवश्यक ते बदल करून घ्यावा लागतो. अर्जदाराला लायसन्स प्राधिकरणास समोर हजर राहावे लागते.

शिकाऊ लायसन्स चाचणी

शिकाऊ लायसन्स प्राप्त करण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करावा लागतो तसेच प्राथमिक चाचणी द्यावी लागते निर्धारित भेटीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागेल. आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. चाचणीतील 60% प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यास उमेदवार चाचणीत उत्तीर्ण ठरेल.

Read  Omicron Variant of Coronavirus in Maharashtra | कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये काय सुरू काय बंद?

पक्के लायसन्स कसे मिळेल?

शिकाऊ लायसन्स काढून 30 दिवस झाल्यानंतर पक्के लायसन चाचणी परीक्षेकरिता अर्ज करता येते.

त्यासाठी काय करावे लागेल?

नमुना 4 अर्ज शिकावू लायसन्स, तीन फोटो वयाचा आणि रहिवासी पुरावा, परिवहन वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटर ट्रेनिंग स्कूलचे प्रमाणपत्र ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची वैध कागदपत्रे.

How to Make Driving Licence Online Offline ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

group

5 thoughts on “How to Make Driving Licence Online Offline | ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसे काढावे?”

Leave a Comment

x