Sarkari Jamin eMojani | जमिनीची सरकारी ई-मोजणी कशी करायची?

Sarkari Jamin eMojani | Mojani Online Application e Mojni Nagrikansathi नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये जमिनीची मोजणी कशी करायची? हे सविस्तर जाणून घेऊया. भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयातून तालुकास्तरावर जमीन मोजणीसाठी अर्ज स्वीकारला जात असतात. अर्ज स्वीकारल्यानंतर अर्जाच्या प्राधान्यक्रमाने आणि जमिनीच्या मोजणी करिता लेखी अर्ज करण्यापासून ते तारीख मिळण्या पर्यंत आणि भूकरमापक यांच्या उपलब्धतेनुसार जमिनीची मोजणी केली जाते.

जमीन मोजणी मध्ये पारंपरिक पद्धतीने जमीन मोजली, तर बऱ्याच अडचणी येऊ लागल्या होत्या.  त्यामुळे भूमिअभिलेख विभागाने याकरता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने ही मोजणी ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे विकसित केलेली आहे. त्याद्वारे आपल्या शेतीची मोजणी ही अचूक आणि लवकर होण्यास मदत होते.

जुन्या काळापासून जमीन मोजणीच्या अनेक पद्धती बदलत गेल्या. त्यामुळे आजच्या काळामध्ये e mojni होते. ही फारच अचूक आणि लवकर होत असते.  ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये राज्यकारभार सुरळीत चालावा व सोयीचा व्हावा याकरता, महसूल वसुली ची एक शिस्तबद्ध यंत्रणा निर्माण करण्यात आली होती. त्याकाळी शंकू साखळी च्या साह्याने मोजणी केली जात होती. जमिनीचे परिमाण म्हणून गुंठा व एकर असे वर्गीकरण केले गेले होते. साधारण 25 एकर क्षेत्राचा एक सर्वे नंबर तयार केला जात असे,  काहीठिकाणी त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे सुद्धा सर्वेक्षण केले जाई.

Read  Discount on Electronic Vehicle | इलेक्ट्रॉनिक वाहनांवर मोठी सूट

नंतर सर्वे नंबर मध्ये भाउ वाटप, खरेदी विक्री, कोर्ट आदेश वगैरे कारणांमुळे त्यामध्ये हिस्से पडले. जमिनीचे अभिलेख संधारण करणे व ते अद्ययावत ठेवणे याकरता महसूल विभागाची निर्मिती केली गेली होती. कालांतराने महसूल विभाग, भूमिअभिलेख विभाग आणि नोंदणी विभाग अशाप्रकारे तीन विभाग केले गेले. त्यानंतर फाळणी मोजणी नकाशे तयार केले गेले.

चंद्रकांत दळवी जमाबंदी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणी प्रकरणांचे नियंत्रण करणारी अद्ययावत अशी संगणक आज्ञावली म्हणजेच ई-मोजणी दिनांक 1 जानेवारी 2012 पासून महसूल विभागाने लागू केली. ई-मोजणी साधारणतः तीन टप्प्यांमध्ये होते. प्रत्येक टप्प्याचे काम खातेदारास घरबसल्या पाण्याची सोय आज्ञावली तुन केल्या गेली आहे.

शेतकरी किंवा खातेदारांना आपल्या हद्दीतील जमिनी बाबत शंका किंवा वाद निर्माण झाल्यास, शंका किंवा वाद सोडवण्याकरता भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी कार्यालयात अर्ज करून हद्द कायम मोजणी करून आपली शंका निरसन करू शकतो.

शेतकऱ्यांचा किंवा खातेदारांचा मानसिक त्रास, वेळ वाया जाणे किंवा खातेदाराचा पैसा खर्ची पडणे अशा सर्व बाबींवर उपाय म्हणून संगणीकृत ई-मोजणी तयार करून शेतकऱ्यांचे समाधान प्रशासकीय कामांमध्ये सुरळीतपणा व पारदर्शकता यावी, त्याकरता ही ई-मोजणी emojni पद्धती सुरू करण्यात आलेली आहे.

Read  Download Online Ration Card आता राशन कार्ड ठेवा मोबाईलमध्ये

ई-मोजणी मुळे होणारे फायदे

सातबारा, मोजणीचा अर्ज, Mojani Fee पावती या तीन कागदपत्रांच्या आधारे मोजणी ची कार्यवाही पारदर्शकपणे केली जात आहे.

शेतकऱ्यांचा मोजणी चा अर्थ संगणकामध्ये नोंद करून, 3 हजार रुपये यावरील रकमेची मोजणी फी ची चलान तात्काळ दिली जाते.

कोषागार मध्ये मोजणी फीचे पैसे भरून मोजणीचा अर्ज कार्यालय मध्ये जमा केला असता, तात्काळ अर्जाची पोच दिली जात असते आणि त्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी यांचा मोबाईल नंबर, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल नंबर याची माहिती दिली जाते.

त्यामुळे शेतकऱ्याचा त्रास वाचतो म्हणजेच खातेदारास ये जा करा लागत नाही.

सरकारी नियमानुसार मोजणी फी शेतकऱ्यांकडून घेतली जाते.

सर्व काही ऑनलाईन कॉम्प्युटरच्या सहाय्याने होत असल्याकारणाने ठराविक कालावधीत प्रकरण निकालात काढण्यावर भर दिला जातो.

खातेदारास ऑनलाईन आपल्या प्रकरणाची माहिती मिळते.

शेवटी असेच म्हणावे लागेल की, खातेदाराला त्याच्या मोजणी प्रकरणाबाबत कार्यालयामार्फत केली जाणारी कार्यवाही पारदर्शकपणे व वेळेस केली जाणारी आहे याची खात्री होते.

मोजनीचे संपुर्ण नियंत्रण मोजणी कार्यालयामार्फत केल्या जात असल्याकारणाने मानवी श्रम तसेच वेळेची बचत होते.

Read  Grampanchayat sarpanch Apatra Niyam information in Marathi language | ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, अपात्र नियम

कुणाचा हस्तक्षेप व चुकांना वाव मिळत नाही.

ई-मोजणी की काही ठळक वैशिष्ट्ये

जमीन मोजणी करता खातेदार आता ऑनलाईन स्विकारला जातो.

ई-मोजणी आज्ञावली द्वारे जमिन मोजणी फी आकारली जाते.

जमीन मोजणी फी चे चलान आज्ञावली द्वारे तयार होते.

भूकरमापक यांचा दौरा कार्यक्रम आखला जातो.

कब्जेदार तसेच अर्जदार या दोघांनाही ई-मोजणी प्रणालीद्वारे तात्काळ नोटीस पाठवली जाते.

जमीन मोजणी प्रकरणांचे काम भुकरमापकना वाटप केल्या जाते.

अर्जदारांना जमीन मोजणी प्रकरणांच्या किंवा अर्जाच्या स्थितीची माहिती e mojni application status ऑनलाईन बघता येते.

ई-मोजणी द्वारे मासिक रिपोर्ट तयार केला जातो.

ई मोजणी ची तारीख तसेच भूकरमापकाचे नाव कागदाची पोच तात्काळ दिली जाते.

आज्ञावली द्वारे मोजणी बाबत रजिस्टर क्रमांक दिला जातो.

emojni pratiksha yadi ऑनलाइन पाहता येते.

मोजणी प्रकरणांचा जिल्हा तसेच तालुका स्तरावरून आढावा सुद्धा घेतला जातो.

आपल्याला जर ही मोजणी करायची असेल तर त्याकरता महाराष्ट्र शासनाच्या https://mahabhulekh. maharashtra.gov.in/emojni या संकेत स्थळावर भेट देऊन अधिक ची माहिती आपण घेऊ शकता.

आपल्याला जर आरोग्याविषयी माहिती हवी असेल तर आमच्या मराठी आरोग्य या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

 

Leave a Comment