12th Maharashtra State Board Examination 2022 Hall Ticket – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी…! बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाइन हॉल टिकीट..!
या लेखात आपण पाहू या बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट कशी उपलब्ध होतील…. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षण बाबत एक मोठी बातमी आपल्यासमोर आली आहे. ती म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हॉल तिकीट देण्यात येणार आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.
बारावी बोर्डाचे ऑनलाइन हॉलतिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.