Car Charging Station information in Marathi | कार चार्जिंग स्टेशन महिती

Car Charging Station information in Marathi मित्रांनो सध्या इलेक्ट्रिकचा जमाना आहे. त्यामुळे आपण मागे राहून चालणार नाही सध्या जरी डिझेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या कार्स तुम्हाला जास्त प्रमाणात दिसत असल्या तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक कार किंवा बाईक आपल्याला रोडवर दिसतील.

जर तुमच्यापैकी कोणी कार चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय करू इच्छित असेल तर त्याच्या करिता ही वेळ खूप चांगली आहे म्हणजेच फायदेशीर आहे. ह्याकरता आपल्याला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे हेच या लेखामध्ये जाणून घेऊया.

तसे पाहिले तर पब्लिक चार्जिंग स्टेशन हा तुम्हाला कमवायचा एक उत्तम पर्याय आहे इलेक्ट्रिक वाहनांची संख्या पुढच्या काळामध्ये नक्की वाढणार आहे सध्याच्या घडीला इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जात आहे कारण ही वाहन प्रदूषण रहित आहेत इलेक्ट्रिक वाहनांच्या उपलब्धतेत होणारी वाढ आणि पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती यामुळे नागरिक हैराण आहेत.

म्हणून नागरिक आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे वळत आहेत त्यामुळे देशातील अनेक नामांकित वाहन उत्पादक कंपन्या विविध प्रकारची इलेक्ट्रिक वाहन उत्पादित करत असताना दिसतात सरकारही इलेक्ट्रिक कार वाहनांच्या वापराला आणि निर्मितीला प्रोत्साहन देत आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची रस्त्यावर संख्या वाढत असताना आपण कार चार्जिंग स्टेशन Car Charging PCS उभा करणे गरजेचे आहे.

Read  तुमच्या आधारकार्ड वर कोणी सिमकार्ड तर वापरत नाही? Aadhar link to Sim Card

दशा एलेक्ट्रिक कार्ड वाढतील तसा नफा सुद्धा चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून वाढणार आहे इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उघडण्या करता येणारा खर्च अगदी कमी असून त्या तुलनेत फायदा मात्र जास्तीचा आहे सध्या चार जण स्टेशन उघडण्यासाठी पेट्रोल पंपा सारखी परवान्याची गरज नाही.

नियम व अटी

ह्या करता आपल्याला ऊर्जा मंत्रालयाने काही नियम आणि अटी ठरवलेले आहेत त्यानुसार सार्वजनिक चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी तीनशे ते पाचशे चौरस फूट जागा असावी ही जागा भाड्याने सुद्धा असली तरी चालेल जेणेकरून एका वेळेस दोन ते तीन वाहन आपण सहज चार्ज करू शकू तसेच आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये सर्व संबंधित उपकरणांसह एक विशेष ट्रांसफार्मर असणेही गरजेचे आहे त्यामध्ये फ्लॅग इन नोझल, 33/11 के बी, केबल सर्किट ब्रेकर असणे गरजेचे आहे.

Read  Aadhaar Smart Card | 50 रुपयांमध्ये घरी बोलवा आधार स्मार्ट कार्ड

चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या वेळी चार्जिंग स्टेशन मध्ये किमान एक इलेक्ट्रिक कीऑस्क हे देखील असणे गरजेचे आहे. ज्यामध्ये आपण अनेक चार्जिंग पॉइंट ठेवू शकू आणि गरजेनुसार त्यामध्ये वाढही करू शकू लांब पल्ल्याच्या आणि अवजड वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन वर 100 KW क्षमतेचे दोन चार्जेस असणे गरजेचे आहे वेगवान चार्टर बसवायचे असल्यास चार्जिंग स्टेशन वर लिक्विड गोल्ड केबल वापरावी लागणार आहे इथली सर्व उपकरणं आयएसओ प्रमाणित असणेही गरजेचे आहे.

याचबरोबर वाहन चार्जिंग करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी ऑनलाइन नेटवर्क सेवा Online Network Service उपलब्ध करून द्यावी लागणार आहे त्याकरता अशी सेवा देणार्‍या पुरवठादार कंपनीशी आपण संपर्क करावा लागेल चार्जिंग स्टेशन उघडण्या करता जमीन भाड्याची असली तरी चालेल त्याकरता तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागेल.

चार्जिंग स्टेशन सुरू करण्या करता काय करावे लागेल?

सर्वप्रथम आपल्याला आपल्या राज्याच्या ऊर्जा विभागाशी संपर्क साधावा लागेल याचबरोबर डेल्टा इलेक्ट्रॉनिक, टाटा पावर, इनहोल्ट, पॅनासोनीक यांसारख्या चार्जिंग स्टेशन स्थापन करणाऱ्या कंपन्यांची ही तुम्ही संपर्क साधू शकता. सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याकरता विद्युत निरीक्षक अर्थात एलेक्ट्रिकल इंस्पेक्टर कडून मंजुरी घेणे खूप आवश्यक आहे. स्थानिक वितरण कंपनी द्वारे इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर ची नियुक्ती केली जात असते. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाईल त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता.

Read  Corona Vaccine Available in Medical | लवकरच मेडिकल मध्येही मिळणार कोरोना लस?

किती खर्च लागेल?

चार्जिंग स्टेशन सुरू करण्या करता आपल्याला साधारण दहा 16.5 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो या मध्ये चार्जिंग उपकरणं वीस अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो तुम्ही तुमचा चायनीज स्टेशन सोळा तास सुरू ठेवल्यास प्रति युनिट 3.5 रुपये या दराने शुल्क आकारून तुम्ही चार वर्षातच तुमचा संपूर्ण खर्च वसूल करू शकता.  ही झाली सध्याची परिस्थिती परंतु पुढे जसे चार्जिंग वाढतील, त्या नुसार तुमचा नफा सुद्धा वाढेल. आणि हे लॉंग लाईफ असणार आहे भविष्याचा विचार करता चार्जिंग स्टेशन उघडणं हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीची कमाई देणारा हा व्यवसाय असल्याकारणाने तुम्ही जर यशस्वी होण्याचे स्वप्न बघत असाल तर यात शंका नाही.

तर मित्रांनो Car Charging Station information in Marathi हा आमचा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा

Leave a Comment