Online Gaming Adiction | ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यातून लहान मुलांना कसं वाचवायचं?

Online Gaming Adiction सध्या लहान मुलांना मोबाईल वर किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर वर गेम खेळण्याचा एवढे वेड लागला आहे की त्यांचे खाण्यापिण्याकडेही लक्ष राहत नाही. आपल्याशी कोण काय बोलतो आहे याचेही त्यांना भान राहत नाही. त्यामुळे सतत पालक आणि पाल्य यांच्यामध्ये युद्ध चालू असते.

सध्या आपण जर लहान मुलांना विचारलं की तुम्ही कुठला गेम खेळता तर 98 टक्के मुलं ऑनलाइन गेम चे नाव सांगतील. म्हणजेच आपल्या मुलांना मैदानी किंवा गल्ली मधील खेळ जे त्यांनी खेळायला पाहिजेत ते सांगता येणार नाहीत.

काही मोजकी मुलं आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करून सक्तीने मैदानावर मैदानी खेळ खेळतात परंतु ती मुलं सुद्धा ऑनलाइन गेम खेळतात. यामध्ये म्हणायचं ते एवढंच की त्यांना ऑनलाइन गेम चे व्यसन लागलेलं असतं पण ऑनलाईन गेम्स व्यसन सध्या इतकं वाढलंय की भारत सरकारने एक ऍडव्हायझरी जारी केली आहे पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला सांगायची पाळी आलेली आहे.

Read  Sakhrechya Utpannaat Ghat | साखरेच्या उत्पन्नात यावर्षी 20 ते 25 लाख टन घट शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसान.

या गोष्टीबद्दल टीव्ही9 हिंदी मे एक वृत्त दिले केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयांतर्गत असलेल्या शिक्षण विभागाने म्हटले आहे की ऑनलाइन गेम मध्ये विजेता ठरलेल्या मुलाला पुढचं आव्हान स्वीकारण्याची चिथावणी दिली जाते. त्यामुळे लहान मुलं आणखी गेम खेळतात या कारणामुळे गेम्सची जास्त प्रसिद्धी होते.

म्हणूनच याचा परिणाम लहान मुलांना या खेळांचं व्यसन लागत आहे हाय स्पीड चे मोबाईल लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वर ऑनलाइन गेम सहज उपलब्ध होत आहेत आणि ते कुठेही बसून खेळता येतात त्यामुळे मुलांचा अभ्यासातलं लक्ष शाळेतलं लक्ष विचलित होत आहे सामाजिक जीवनात जगत असताना त्यांना अनुभव कमी मिळतो आहे.

अशा परिस्थिती मध्ये गेल्या दोन वर्षापासून करून संकटामुळे शाळा बंद असल्याने मुलं मोबाइल आणि इंटरनेट मध्ये जास्त गुंतली गिमिक्स प्रचंड प्रमाण वाढलं, गेम खेळण्याच्या व्यसनाला मानसिक आरोग्य शास्त्राच्या भाषेत गेमिंग डिसऑर्डर म्हणतात.

कारण या गेम्सच्या डिझाईन एवढं चांगलं केलेलं असतं की प्रत्येक पुढच्या पायरीवर खेळाडूला अधिक आव्हान दिले जातात त्यामुळे आधीची पायरी किंवा लेव्हल जिंकून त्याचं समाधान होत नाही तो गेम च्या आणखी पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे स्वतःला विसरून जातो जगाला विसरून जातो मुलांना केबिनच सवयीतून बाहेर काढण्यासाठी पालकांनी काही गोष्टी टाळाव्यात असं शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. आपल्या मुलाला ऑनलाइन गेम चे व्यसन लागलं आहे की नाही हे कसं तपासायचं? ह्या सर्व गोष्टी ऍडव्हायझरी मध्ये सांगण्यात आलेले आहेत.

Read  आधार कार्ड डाऊनलोड चेक | UIDAI Aadhar Card Download in Marathi

पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

पालकांनी स्वतःची परवानगी असल्याशिवाय मुलांना ऑनलाइन गेम खेळू देऊ नये.

मुलांकडून ऑनलाईन गेम विकत घेऊ नये, याकरता आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ओटीपी आधारित पेमेंट मेथडचा वापर करावा.

गेमचे सबस्क्रीप्शन करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ची माहिती ऑनलाइन साइटवर सेव करू देऊ नका.

आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चे ऑनलाइन ट्रांजेक्शन चे लिमिट नक्की करा, म्हणजेच त्या पलिकडच्या व्यवहारांना बँक परवानगी देणार नाही.

मुलं मोबाईल किंवा लॅपटॉप वरून गेमिंग करतात त्यांना थेट शॉपिंग करू देऊ नका.

अपरिचित असलेले वेबसाइट किंवा सॉफ्टवेअर किंवा गेम डाऊनलोड करू देऊ नये.

लहान मुलांना वेबसाईटवर पाप अप किंवा इतर लिंक येतात त्यावर ती करू नका असं निक्षून सांगा.

Read  Sarpanch Upsarpanch mandhan सरपंच व उपसरपंच मानधन information in Marathi language |

अपरिचित साइटवर अपरिचित माणसांशी, वेब्क्याम, पर्सनल मेसेज किंवा ऑनलाइन चॅटिंग करू नका.

लहान मुलांना दीर्घकाळपर्यंत एकच एक गेम खेळत बसू देऊ नका.

कुठल्याही गोष्टीचा टाईमटेबल असतो. लहान मुलांना गेम खेळू देण्यासाठी टाईम टेबल बनवा.

लहान मुलांना पालकांनी स्वतः ग्राउंड वर जाऊन मैदानी खेळ खेळा.

लहान मुलांना सामाजिक कार्यक्रम, भटकंती, नवीन गोष्टींचे ज्ञान याकडे आकर्षित करा.

पालकांनी स्वतः शिक्षित असो वा अशिक्षित मुलांना जवळ बसवून अभ्यास करून घ्या.

लहान मुलांचे ऑनलाईन गेम्स व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये कसे लक्ष कसे लागेल याकडे स्वतः आवर्जून प्रयत्न करावे.

 

 

Leave a Comment