Kharip Hangam Paisevari Anevari मित्रांनो खरीप हंगाम 2021 करीता पैसेवारी म्हणजेच आणेवारी काही जिल्ह्यांची जाहीर झालेली आहे. सरसकट पिक विमा तेव्हा एखाद्या मंडळाला मिळतो जेव्हा त्या मंडळाची आनेवारी 50 पैशांपेक्षा कमी असेल. पिक विमा करता बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रेम केले काही शेतकऱ्यांना प्रेम करता आले नाहीत किंवा त्या शेतकऱ्यांना कसा प्रेम करायचा याची माहिती सुद्धा नाही त्यामुळे सरसकट पिक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांचे बँक डिटेल्स आधार कार्ड किंवा इतर कागदपत्र चुकीच्या असल्या कारणाने त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा क्लेम केला त्यांना सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पीक विम्याची रक्कम मिळाली नाही मजेत तुटपुंजी रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आशा असते ती सरसकट पीक विमा मिळण्याची.
सरसकट पिक विमा शेतकऱ्यांना तेव्हाच मिळू शकतो जेव्हा शेतकरी ज्या मंडळांमध्ये असेल त्या मंडळाची आनेवारी म्हणजेच पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असेल.
15 डिसेंबर पर्यंत पैसेवारी जाहीर केल्या जात असते ती पैसेवारी आता हळूहळू अनेक जिल्ह्यांची जाहीर होत आहेत. कोणत्या जिल्ह्याची पैसेवारी जाहीर झाली आणि त्यामध्ये कोणत्या मंडळाची पैसेवारी किती आहे ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ.
आपण महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर पैसेवारी जाहीर झाल्याचे पाहू शकता.
या पैसेवारीमध्ये 50 पैशापेक्षा कमी असलेले मंडळ आहेत ते पिक विमा किंवा नुकसान भरपाई पात्र असतात.
गोंदिया जिल्हा
गोंदिया जिल्ह्याची 0.81 पैसे अंतिम पीक आणेवारी जाहीर झाली आहे जिल्ह्यातील 955 गावांपैकी एकाही गावाची पैसेवारी 60 पैसे च्या आत नाही.
गोंदिया 0.95 पैसे गोरेगाव 0.80 पैसे तिरोडा 0.77 पैसे अर्जुनी मोरगाव 0.81 पैसे देवरी 0.90 पैसे खामगाव 0.85 पैसे सालेकसा 0.72 पैसे सडक-अर्जुनी 0.64 पैसे.
गडचिरोली जिल्हा
जिल्ह्यातील 1377 गावांमध्ये 61 पैसे पैसेवारी लागली आहे.
नांदेड जिल्हा
नांदेड 47 अर्धापूर 48 कंधार 47 लोहा 45 भोकर 49 मुदखेड 48 हदगाव 48 हिमायतनगर 47 किनवट 46 माहूर 46 देगलूर 48 मुखेड 48 48 नायगाव 47 धर्माबाद 48 उमरी 49
हिंगोली जिल्हा
हिंगोली जिल्ह्यातील 707 गावांची पैसेवारी 45.99 पैसे आली आहे.
परभणी जिल्हा
परभणी जिल्ह्यातील सर्व 848 गावांची अंतिम हंगामी पैसेवारी 47. 60 पैसे आली आहे
बुलढाणा जिल्हा
बुलढाणा जिल्हा खरीप हंगाम आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे.
देऊळगाव राजा 48
खामगाव शेगाव सिनखेडराजा मोताळा चिखली मेहकर लोणार 47
नांदुरा संग्रामपुर 45
जळगाव जामोद 41
बुलढाणा व मलकापूर 46
अकोला जिल्हा
अकोला जिल्हा पैसेवारी 47 पैसे आली आहे.
तेल्हारा 47 अकोट 48 अकोला 47 बाळापुर 47 पातुर 48 मुर्तीजापुर 48 बार्शीटाकळी 47
वाशिम जिल्हा
वाशिम जिल्ह्यामध्ये 793 महसुली गावे असून 793 गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे.
यामध्ये मंगळुरपीर 48 रिसोड 47 मालेगाव 47 कारंजा 48 मानोरा 48 पैसे.