PF Withdrawal आपण जर सरकारी किंवा खाजगी कर्मचारी असाल तर तुम्हाला तर महिन्याला तुमच्या वेदना मधून काही रक्कम कपात करावी लागते आणि ती रक्कम म्हणजे तुमच्या पीएफ खात्यांमध्ये जमा होणारी रक्कम असते. जमा झालेली रक्कम तुमच्या हक्काचे असते अडीअडचणीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या PF मधुन रक्कम केव्हाही काढू शकता मात्र ही रक्कम काढताना अनेक नियम आहेत जर तुम्हाला हे नियम माहिती असतील तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यामधून रक्कम कधीही काढू शकाल. पीएफ खात्यामधून विड्रॉल करतांना आपल्याला कोणत्या अटींचे पालन करावे लागते ते बघूया.
PF खात्यामधून किती रक्कम भरता येते?
1. जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाचे लग्न असेल तर त्या व्यक्तीच्या लग्न करता तुम्ही तुमच्या पीएफ खात्यामधून काही रक्कम काढू शकता तुमच्या वतीने तुम्ही पीएफ खात्यांमध्ये जेवढे पैसे जमा केलेले असतील त्याच्या 50 टक्के रक्कम तुम्हाला लग्नाकरता मिळू शकते मात्र याकरिता तुम्ही कमीत कमी 7 वर्ष पीएफ खात्यात रक्कम जमा करणे आवश्यक असते म्हणजेच तुमचे पीएफ खाते सात वर्षाचे असणे गरजेचे आहे मिळणाऱ्या पैशांमधून तुम्ही तुमच्या लग्नाचा खर्च करू शकता.
2. तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या शिक्षणाची सोय करायची असेल आणि त्यांना शिक्षणाकरता पैशांची गरज असेल तर तुम्ही पीएफ कडून पैसे काढू शकता मुलांच्या शिक्षणाकरता तुम्हाला पीएफ मध्ये जमा झालेल्या रकमेच्या 50 टक्केपर्यंत रक्कम मिळू शकते परंतु यासाठी तुम्ही देखील 7 वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरीमध्ये असणे गरजेचे आहे तुम्ही शिक्षणाकरिता पीएफ खात्यामधून नंतरच पैसे काढू शकाल.
3. आणखी तुम्ही एका गोष्टी करता पीएफ खात्यामधून पैसे काढू शकता ते म्हणजे तुम्हाला घर खरेदी करायची असेल तर यामध्ये सुद्धा 50 टक्के रक्कम तुम्हाला मिळू शकते मात्र याकरता तुम्ही सलग 5 वर्षे नोकरीमध्ये असणे गरजेचे आहे.
तर अशाप्रकारे मित्रांनो आपण पीएफ खात्यामधून वेगवेगळ्या कारणांकरता वेगवेगळ्या वेळी जमा झालेली रक्कम काढू शकता ज्यास आपण PF Withdrawal म्हणतो.
अशाच प्रकारच्या बातम्या करता आमच्या आई मराठी आणि अद्भुत मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.