Crop Insurance | शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट नुकसान भरपाई, 30 हजार रुपये.
Table of Contents
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. ती नुकसान भरपाई किती मिळणार व कशी मिळणार चला तर मग पाहूया. परतीच्या पावसाने ऑक्टोंबर मध्ये चांगलेच नुकसान केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेला नुकसानीचे शेतकऱ्यांना मदत म्हणून पिक विमा कंपनीने नवीन निर्णय घेतला आहे. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण उदर्निवाह हवा शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कोणताही ऋतू असो अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टी होते. अशा नैसर्गिक कारणांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा काढलेला आहे. किंवा काढलेला असेलच. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा काढलेला असेल तर त्यांना पिकाच्या नुकसानी पोटी नुकसान भरपाई दिली जाते. खरीप पिक विमा त्यात सोयाबीन उडीद मूग कापूस तूर आणि इतर काही पिकांचा समावेश असेल पिक विमा योजनेअंतर्गत पिकाच्या नुकसान झाले तर तुम्हाला आर्थिक मदत दिली जाते. पिकांचे नुकसान झाले की, तुम्हाला 72 तासाच्या आत विमा कंपनीला हे कळवावे लागते. पिक विमा कंपनीला कळविण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप आहे. या ॲपद्वारे पिकांचे नुकसान झाल्याबाबत कंपनीला कळविले जाते. पिक विमा कंपनीला नुकसानी बाबत मोबाईल द्वारे कळविल्यानंतर काही दिवसांनी पिक विमा प्रतिनिधी नुकसानीचा पंचनामा करतात. पंचनामा केल्यानंतर तुम्हाला पिक विमा दिला जातो. जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर, तुम्हाला पिक विमा हा नक्कीच मिळणार आहे. राज्य सरकारकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आता 27 हजार रुपये दिले जातील. ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना पिक विमा देखील मिळणार आहे. तसेच राज्य सरकारकडून डबल नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे. ही बातमी शेतकऱ्यांना आनंद देणारी आहे.