Changes in PM Kisan Yojna | पी एम किसान योजना मध्ये झालेले हे बदल

Changes in PM Kisan Yojna शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये घोटाळेबाजांना पकडण्या करता त्यांची डाळ न शिजू देण्याकरिता नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. या नियमांची पूर्तता केल्याशिवाय आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाही जमा होणार नाही. यामुळे घोटाळे करणारे उघडकीस येतील आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांना पी एम किसान योजनेच्या माध्यमातून पैसे मिळतील.

सरकारने आता पी एम किसान योजनेतील घोटाळेबाजांना आळा घालण्याकरीता नियम बदलले आहेत मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रेशन कार्ड अनिवार्य केले आहे आता त्याशिवाय पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेशी संबंधित एजन्सी कडे तातडीने नियमातील बदलाच्या अनुषंगाने रेशन कार्डची पूर्तता करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत.

Read  Ek Shetkari Ek DP Yojana | एक शेतकरी एक डीपी योजना

रेशन कार्ड नंबर अनिवार्य

आता पंतप्रधान किसान योजना अंतर्गत नवीन नोंदीवर रेशन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे एकदा रेशन कार्ड क्रमांक मिळाल्यानंतर कुटुंबातील एका सदस्याला किसान सन्मान निधी योजनेची च लाभ मिळेल रेशन कार्ड सादर न केल्यास शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही.

कोणती ओरड झाली रद्द?

शेतकऱ्यांना आता प्रथमच पंतप्रधान किसान योजना अंतर्गत नोंदणी वर रेशन कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर रेशन कार्ड ची पीडीएफ कॉपी अपलोड करावी लागणार आहे. मात्र आता या कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. याकामी सरकारने एक दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे. योजनेशी संबंधित कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, खतावणी, बँक पासबुक आणि जाहीरनाम्याच्या सत्य प्रती सादर करण्याची गरज उरली नाही. आता या कागदपत्रांच्या केवळ पीडीएफ फाइल्स तयार करून पोर्टल वर अपलोड करण्यात याव्यात. त्यामुळे पंतप्रधान किसान निधी योजना अंतर्गत होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल आणि नोंदणी करणे सोपे देखील होईल.

Read  जनधन खाते धारकांसाठी खुशखबर! Jandhan Bank Account

चालू स्थिती तपासण्याकरिता नियमात बदल

शेतकरी मित्रांनो,  यापूर्वीही पंतप्रधान किसान योजनेमध्ये बदल झालेला होता. याअंतर्गत शेतकऱ्यांना मोबाईल नंबर द्वारे योजनेत त्यांची सद्यस्थिती म्हणजे चालू स्थिती तपासता येत होती. परंतु घोटाळेबाजांना पावर घालण्याकरीता या सेवेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. किसान पोर्टल वर आधार क्रमांक किंवा बँक खाते नंबर देऊनच शेतकऱ्यांना या योजनेतील आपली चालू स्थिती म्हणजे सद्यस्थिती तपासता येणार आहे.

नक्की वाचा: योगा आणि अद्भुत मराठी ब्लॉग

 

Leave a Comment