या भरपाई मध्ये शेतकऱ्यांना दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत दुपटीने मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. यामध्ये बगाया पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 13500 वरून 27 हजार रुपये केले आहेत . आणि बहुवार्षिक पिकांसाठी अठरा हजार रुपयांवरून 36 हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आहे ही मदत शासनाने घोषित केली आहे . यावर्षी 24 तासात 65 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे आणि गावातील 33% जास्त शेती पिकाचे हे नुकसान झाले होते म्हणून सरकारने ही मदत जाहीर केली आहे. आणि या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा होणार आहे. लाभार्थ्यांची यादी व मदत जिल्ह्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.