Cycle Subsidy for School Girls | महाराष्ट्र सरकार कडून मुलींना सायकल करता 5 हजार रुपये अनुदान

Cycle Subsidy for School Girls आठवी ते बारावी च्या मुलींना आनंदाची बातमी….. राज्य सरकारचा देणार 5000 रूपये सायकलसाठी अनुदान….

राज्य सरकार तर्फे इयत्ता आठवी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वितरणाची योजना आहे. या योजनेच्या अटी आणि निकषांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. त्यात झालेल्या बदलांविषयी महत्त्वाची माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

घरापासून शाळेचे अंतर दूर असल्यामुळे बरेच विद्यार्थीनी सायकलने शाळेत येत असतात. परंतु सायकल खरेदी करण्याइतपत त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे राज्य सरकारने मुलींना सायकल वाटप या विषयी निर्णय घेतला आहे त्यामध्ये काय बदल झाला, त्या निर्णय विषयी आपण माहिती पाहूया.

शासन निर्णयातील बदल

Table of Contents

मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल वितरणासाठी अनुदान वितरित करण्यात येत असते. त्यामध्ये बदल झालेला आहे. शासन निर्णयातील बदलाविषयी माहिती देणारा हा महाराष्ट्र शासनाचा दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजीचा शासन निर्णय आहे. तर शासन निर्णयात काय माहिती दिली.

मित्रांनो, आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून 5 किमी म्हणजे 4-5 किमी अंतराच्या आत राहणाऱ्या लाभधारक मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी देण्यात येणारे अनुदान देऊ करण्यात येत असून प्रत्येक 5000/- रुपये इतके मान्यता देण्यात आलेली आहे.

अनुदान उपलब्ध करण्याचे टप्पे

मित्रांनो, या असं वाटपाचे धोरण निश्चित करण्यात आलेल असलं तरी पहिला टप्पा हा गरजूंच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात डी. बी.टी. प्रणालीद्वारे 3500/- रुपये अनुदान रक्कम जमा करण्यात येईल आणि त्या मुलीने सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदी केल्याची पावती आणि इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरित 1500/- रुपये रक्कम बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे.

Read  महिलांकरिता महाराष्ट्र शासनाच्या योजना Maharashtra Government Schemes for Womens 2021

समाविष्ट शाळा

मित्रांनो, यामध्ये समाविष्ट शाळा कोणकोणत्या आहेत. शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रम शाळेमधील मुलींना डेस्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये-जा करावी लागते. अशा शाळेच्या मुलींना ही योजना लागू करण्यात येत आहे.

निकष

1) गरजू मुलींना इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वायत्तता राहील व त्यांना या चार वर्षांमध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान देय राहील.

2) गरजू मुलींना सायकल वाटप करताना पूर्वीच्या अनेक वचन सोबतच जी गावे, वाड्या, डोंगराळ व अतिदुर्गम भागात आहेत व जिथे जाण्यासाठी सुयोग्य रस्ते नाही तथा वाहतुकीची पुरेशी साधने व्यवस्था उपलब्ध नाही, अशा ठिकाणी राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य देण्यात यावे. या निकषाचा समावेश करण्यात येत आहे.

Read  Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 

यापूर्वी सायकल वितरणासाठी 3500/- रुपये देण्यात येत होते. मात्र आता त्यामध्ये वाढ करून 5000/- रुपये अनुदान करण्यात आले आहे. या योजनेविषयीची आणखी माहिती पाहायची असेल तर तुम्ही गव्हर्मेंट वेबसाईट वर पाहू शकता.

Cycle Subsidy for School Girls ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे नक्की वाचा:- अद्भुत मराठी आणि आई मराठी

One thought on “Cycle Subsidy for School Girls | महाराष्ट्र सरकार कडून मुलींना सायकल करता 5 हजार रुपये अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published.

x