ग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website

ही वेबसाइट सर्च केल्यानंतर पुढील प्रकारची पेज आपल्यासमोर ओपन झालेले दिसेल त्या पेज वरती इग्रामस्वराज या वेबसाईट चे पेज ओपन झालेले आहे. या पेजवर ते आपल्याला खालच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे. या ठिकाणाहून आपण भरपूर माहिती मिळवू शकतो, परंतु हे एक पोर्टल आहे आणि नवीन सर्व माहिती अपडेट होत असते.

मित्रांनो खालच्या बाजूला आल्यानंतर  रिपोर्ट चे काही प्रकार दिसतील त्यामध्ये एक आहे पंचायत प्रोफाइल तर  महाराष्ट्रातील ग्राम पंचायतीमध्ये किती सदस्य आहेत आणि त्या सदस्यांची संपूर्ण माहिती आपल्याला 45 प्रोफाइल वर मिळेल.

तर आजचा विषय आहे आपला प्लॅनिंग.  प्लॅनिंग वरती आपल्याला क्लिक करायचा आहे प्लॅनिंग वरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे एक पेज ओपन होईल. त्यानंतर आपल्याला दोन टॅब दिसतील, प्लॅनिंग आणि रिपोर्ट, तर  आपल्याला प्लॅनिंग वरती क्लिक करायचे आहे किंवा  तुम्ही प्लॅनिंग च्या बाजूला एक प्लस आयकॉन पाहू शकता त्याच्यावर क्लिक केले तरी चालेल.

आपल्या समोर सहा प्रकारच्या टॅब ओपन झाल्या असतील तर मित्रांनो दोन नंबरची टॅब आहे. Approved action plan report यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. ॲक्शन प्लॅन म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जो निधी प्राप्त झालेला आहे तो निधी ग्रामपंचायत या योजनावर आणि कोणत्या बाबीवर खर्च करणार आहे.

प्लॅन आराखडा हा पंचायत समिती सादर करायचा असतो आणि अशा आराखंडयास ज्यावेळी पंचायत समिती मंजुरी देते, त्याच वेळेस ग्रामपंचायतला असे विकास कामे आणि विविध बाबीवरील खर्च करता येत असतो. तर त्याच विकास कामाची किंवा action plan ची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल.

आपल्याला ॲक्शन प्लॅन वरती क्लिक करायचे आहे ॲक्शन प्लॅन वरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रकारचे पेज ओपन झाले असेल. आता आपल्याला सिलेक्ट प्लॅन टाकावे लागेल. आपल्याला गोष्टीची निवड करावी लागेल  कोणत्या वर्षाची माहिती आवश्यक आहे हे तुम्ही टाकावे लागेल. आपल्याला जर चालू वर्षाची माहिती हवी असेल तर आपण 20019 -20 या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर  कॅपच्या कोड दिसेल तो भरायचा आहे  जसेच्या तसे प्लॅन इयर आणि कॅपच्या कोड व्यवस्थित टाकल्यानंतर गेट रिपोर्ट या टॅबवर क्लिक करायची आहे.

गेट रिपोर्ट या टॅब वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रकारची पेज ओपन होईल. मित्रांनो आपल्याला या पेजवर ती आपल्या राज्याची निवड करायची आहे यामध्ये सर्व राज्य दिलेले आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्याची निवड करावी.  महाराष्ट्र राज्यात राहत असाल तर महाराष्ट्र राज्य हे वीस क्रमांक वर राहील आणि जे निळ्या रंगांमध्ये अंक आहेत त्या अंकावर आपल्याला क्लिक करायचे आहे.

येथे क्लीक करून whastapp ला जॉईन व्हा

मित्रांनो या अंकावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निवड केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी दिसणार आहे तर ज्या जिल्ह्याची माहिती हवी त्यावर जा, तालुका निवडा, आपले गाव निवडा. ज्या राज्यात राहत असाल त्या राज्याच्या समोर  निळ्या अक्षरात तीन नंबर दिले राहतील. त्या नंबर वर क्लिक करा. आपण त्या तीन अंकावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर त्या राज्याची व जिल्ह्याची सविस्तर यादी आपल्या समोर दिसून येईल.

आपले जे गाव असेल त्या  वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या गावाची संपूर्ण माहिती दिसून येईल.  ग्रामपंचायतीतील आपल्याला पूर्ण डाटा मिळणार आहे. Grampanchayat Nidhi ही पोस्ट कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.

आपण हे वाचलं का?

मराठी स्कूल marathi school ब्लॉगला अवश्य भेट द्या