या योजनेमध्ये खास गोष्ट अशी म्हणजे या योजनेचे परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो ज्या नागरिकाने कर्ज घेतलेले आहे त्याला एक मुद्रा कार्ड दिले जाते त्याच्या वर तो व्यवसायासाठी जो खर्च केला आहे तो त्यावर करू शकतो. आपल्या देशातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा फायदा स्वतःचे व्यवसाय चालू करण्यासाठी घेऊ शकते या योजनेतून आपण आपला व्यवसाय चालू करण्यासाठी दहा लाख पर्यंत कर्जासाठी विनंती करू शकतो मुद्रा लोन च्या साठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँका त जाऊन एक अर्ज सादर करावा लागतो तेथे काही कागदपत्रे सादर करावी लागतात ती पुढील प्रमाणे आहेत जसे आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर कामासंबंधी माहिती द्यावी लागते. तेथे जाऊन काही कागदपत्रे सादर करावी त्यानंतर तुम्हाला बँक मॅनेजरला तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती द्यावी लागते त्या आधारावर तुम्हाला लोन मंजूर दिले जाते बँकेतले शाखा व्यवस्थापक तुम्हाला या प्रोजेक्ट बद्दल एक रिपोर्ट तयार करायला देतील तो तुम्ही तयार करून देऊ शकता शासनाच्या अधिकृत वेबसाईटला या योजनेचे अधिक माहिती आहे तेथे जाऊन पण तुम्ही वाचू शकता.
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा .