शेतकरी दिनाचे महत्व २०२२ | National Farmer’s Day 2022 :- आपल्या भारताचे पाचवे पंतप्रधान चरणसिंग चौधरी यांच्या समानार्थ राष्ट्रीय शेतकरी दिन हा दिवस साजरा केला जातो. चौधरी चरण सिंग हे अत्यंत साध्या स्वभावाचे आणि चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे नेते होते. चौधरी चरण सिंग हे पंतप्रधान देखील होऊन गेले पण त्यांचा कार्यकाल अत्यंत कमी काळाचा होता त्यांचा कार्यकाळ हा 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत अत्यंत अल्प दिवसांसाठी होता चौधरी चरण सिंग यांनी पंतप्रधान होऊन आपल्या देशाची सेवा केलेली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकरी बांधवांची मदत देखील केली आहे. व त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक धोरनांचा अवलंब केला. ज्यामुळे शेतकरी बांधवांचे विचार व शेती कशा प्रकारे केली पाहिजे हे त्यांना सांगण्यात आले. चौधरी चरण सिंग हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे व भारतीय माननीय पंतप्रधान असूनही त्यांनी निर्णय अतिशय साध्या व सोपे जीवन जगले. आपला भारत देश हा मुख्यता खेड्यांचा देश असून शेतीप्रधान देश आहे. व बहुसंख्या लोक हे शेती करतात भारतवासीयांचा शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. या काळात सुद्धा आपल्या भारतातील काही लोक हे 70% शेतीवर अवलंबून आहेत की ज्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो आपल्या देशात उत्पादकता वाढली आणि त्यामुळेच भारत वेगवेगळ्या व विविध कृषी मालमत्तेमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे. 1960 च्या काळात पंजाब आणि हरियाणा मध्ये विकसित झालेला हरितक्रांतीने देशाचे चित्र बदलले व कृषी प्रधान देश निर्माण केला व त्यामुळे वाढलेली उत्पादकता आणि त्यामुळे भारत विविध कृषी मालमत्तेमध्ये परिपूर्ण झाला माननीय चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांना भारताचा कणा म्हटलेला आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी केलेल्या महान कार्याचा व आपल्या त्यागाचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चौधरी चरण सिंग हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री देखील होऊन गेलेले आहेत ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे कार्य केलेले आहे व त्यांच्यामुळेच शेतकरी आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालेला आहे त्यांनी जमीनदारी रद्द शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी लेखापद हे सुद्धा बनवलं त्यानंतर असते पण उपपंतप्रधान बनले मग मग पंतप्रधानपदी विराजमान असताना त्यांनी आपल्या भारत देशाची सेवा केलेली आहे.