Nuksan Bharpai Yadi 2022 ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेले आहे महसूल आणि कृषी विभागाला याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू झालेले असून या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे.
आमच्याशी जुळण्याकरिता येथे क्लीक करा
मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून जुलै महिन्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना 4700 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. एन डी आर एफच्या निकषा पेक्षा दुपटीने जास्त व दोन ऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव मदत देण्यात आलेली आहे. लवकरच पंचनाम्यांची कारवाई होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगण्यात आले आहे.