1) पॅन कार्डचा नंबर कुठेही टाकताना पुन्हा तपासा.
2) पॅन कार्डमध्ये दिलेला 10 अंकी क्रमांक काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
3) चुकीची माहिती भरल्याबद्दल तुमच्यावर दंड आकारला जाऊ शकतो.
4) इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पॅन नंबर योग्यरित्या प्रविष्ट करा आणि पुन्हा तपासा.
5) चुकीची पॅन माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
6) आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत आयकर विभाग चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीवर दंड ठोठावू शकतो.
7) दोन पॅन कार्ड ठेवल्यास दंड आकारला जाऊ शकतो
तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर एक कार्ड सरेंडर करणे आवश्यक आहे.
8) दोन पॅन कार्ड धारण केल्याने मोठा दंड होऊ शकतो आणि बँक खाती गोठवू शकतात.
9) जर दोन पॅनकार्ड असतील, तर जा आणि एक पॅन विभागाकडे सरेंडर करा.
10) आयकर कायदा 1961 च्या कलम 272B मध्ये हे प्रदान केले आहे.
11) दोन पॅन कार्ड धारण केल्यास 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो.
दुसरे पॅन कार्ड कशाप्रकारे सरेंडर करणार?
वास्तविक पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रियाही खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला प्रथम प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन सामान्य फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. तुम्ही वेबसाईटला भेट देऊन आणि नवीन पॅन कार्डसाठी विनंती किंवा/ आणि पॅन डेटामध्ये बदल किंवा सुधारणा या लिंकवर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करू शकता. यानंतर फॉर्म भरा आणि कोणत्याही NSDL कार्यालयात सबमिट करा. या दरम्यान लक्षात ठेवा की फॉर्म सबमिट करताना फॉर्मसह दुसरे पॅन कार्ड सबमिट करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईनही करू शकता.